Posts

Showing posts from February 22, 2024

जमातुल मुस्लिम संस्था, म्हसळा यांच्या वतीने पाणपोईचे उदघाटन

Image
जमातुल मुस्लिम संस्था, म्हसळा यांच्या वतीने पाणपोईचे उदघाटन म्हसळा : दि. २०/०२/२०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता जमातुल मुस्लिम संस्था म्हसळा या संस्थेच्या वतीने एस.टी. स्टॅन्ड येथे पाणपोईचे उदघाटन करण्यात आले. त्याप्रसंगी जमतुल मुस्लिम म्हसळा सचिव साजिद हुर्जुक, शुएब घराडे, शौकत घरटकर, मुनीर जमादार, फारुक डोसानी, बुरहान वसगरे, नईम दळवी, मुजीब साने, अभय कळमकर, मनोहर तांबे, अकमल कादरी, शहजाद लांबे, शाहनवाज उकये, अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच बाजारा मध्ये हि पाणपोईची सुविधा करण्यात आली आहे. दोन्ही ठिकाणी थंड फिल्टर पाण्याचे जार जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. तरी जनतेने या थंड पाण्याच्या पाणपोईचा लाभ घ्यावा. कोणत्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची गरज भासत असेल तर आपण संस्थेकडे संपर्क साधावा. पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात येईल. एस.टी. स्टॅन्ड मध्ये येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये तसेच उन्हाळा चालू झाला आहे, उन्हामुळे माणसाला खाण्यापेक्षा पाण्याची जास्त गरज लागते. म्हणून संस्थेने हि पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्याचे ठरविले. आज पासून स

जिजामाता शिक्षण संस्था म्हसळा संचलित मराठी माध्यमिक शाळा वरवठणे आगरवाडा येथे शिवजयंती साजरी करण्यात आली संस्थेचे संस्थापक महादेव पाटील साहेब यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांना संस्थापक महादेव पाटील साहेब यांनी मार्गदर्शन केले आणि परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या त्यावेळी संदीप कांबळेकर, नितीन म्हस्के, दीपक म्हात्रे अंगद कांबळे अंकुश गाणेकर, लक्ष्मण गाणेकर आदी शिक्षक आणि कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते

Image
जिजामाता शिक्षण संस्था म्हसळा संचलित मराठी माध्यमिक शाळा वरवठणे आगरवाडा येथे शिवजयंती साजरी करण्यात आली संस्थेचे संस्थापक महादेव पाटील साहेब यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांना संस्थापक महादेव पाटील साहेब यांनी मार्गदर्शन केले आणि परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या त्यावेळी संदीप कांबळेकर, नितीन म्हस्के, दीपक म्हात्रे अंगद कांबळे अंकुश गाणेकर, लक्ष्मण गाणेकर आदी शिक्षक आणि कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते

पनवेल राज क्लब, कपल क्लब आणि कामोठे विनम्र क्लब येथे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या आशिर्वादाने मोठे जुगाराचे अड्डे - अ‍ॅड. काशिनाथ ठाकूर

Image
पनवेल राज क्लब, कपल क्लब आणि कामोठे विनम्र क्लब येथे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या आशिर्वादाने मोठे जुगाराचे अड्डे - अ‍ॅड. काशिनाथ ठाकूर  पनवेल (प्रतिनिधी) पनवेल तालुक्यातील सुकापूर येथे राज क्लब, भिंगारवाडी येथे काळुंद्रे गावाजवळ कपल क्लब आणि कामोठे येथे विनम्र क्लब या तीन ठिकाणांवर बेकायदा जुगाराचे अड्डे/धंदे सुरू असून यांपैकी कपल क्लब येथे कपल लेडीड डान्स बारमध्ये देखील रात्री उशीरापर्यंत बेकायदा व नियमबाह्य प्रकारांचा धिंगाणा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार प्रहार जनशक्ती पक्षाचे सरचिटणीस अ‍ॅड. काशिनाथ ठाकूर यांनी उघडकीस आणलेला आहे. पनवेल तालुक्यातील सुकापूर येथे "राज क्लब" मध्ये, काळुंद्रे गावच्या हद्दीत असलेल्या "कपल" क्लबमध्ये, तसेच कामोठे येथील "विनम्र" क्लबमध्ये 3 पत्ती, 13 पत्ती पॉईंट रम्मी, 21 पत्ती पॉईंट रम्मी, 27 पत्ती पॉईंट रम्मी हे जुगाराचे गेम खेळले जात असून येथे 10 रू, 20 रू, 50 रू, 100 रू, 200 रू, 500 रू. अशा पॉईंटने जुगार खेळला जात आहे. विशेष म्हणजे कपल कपल लेडीज डान्स बारमध्ये तर किळसवाण्या प्रकारांनी कहर केला असून येथे तर रात्री उश

राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना म्हसळा आणि कोकण युवा प्रतिष्ठान म्हसळा यांच्या वतीने १२ वी च्या परीक्षार्थीना पेनाचे वाटप

Image
राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना म्हसळा आणि कोकण युवा प्रतिष्ठान म्हसळा यांच्या वतीने १२ वी च्या परीक्षार्थीना पेनाचे वाटप सन्मानिय खासदार सुनीलजी तटकरे साहेब आणि सन्मानिय बालकल्याण मंत्री अदितीताई तटकरे आणि सन्मानिय विधान परिषदेत आमदार आनिकेत भाई तटकरे यांचे सर्वांचे प्रयत्नाने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस म्हसळा शहर अध्यक्ष शाहनवाज उकये यांचे संकल्पनेतून उच्चमाध्यमिक शाळांत परीक्षा २०२४ इयत्ता १२ वी च्या परीक्षार्थीना पेन भेट देऊन शुभेच्छा देत प्रोस्ताहित करण्यात आले. हे पेन नसुन विध्यार्थ्यांच्या भाविशाचे छोटस शस्त्र आहे. अंजुमन हायस्कूलमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाला प्राचार्य अब्दुल रहिमान घराडे सर, कोकण युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अकमल अस्लम कादिरी,नवाझ नझिरी, मनोहर तांबे, नदीम दफेदार, अभय कळमकर, इमरान दरोगे,असीम चोगले, अनस हसपाटील, इरशाद खान, यांच्यासह राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सर्व सदस्य, शिक्षक वर्ग या वेळी उपस्थित होते.