पनवेल, नवी मुंबई हद्दीतील डान्सबारमधील अनैतिक प्रकारांविरूद्ध कारवाई करायला पोलीस आयुक्त का घाबरतात? - अॅड. काशिनाथ ठाकूर
पनवेल, नवी मुंबई हद्दीतील डान्सबारमधील अनैतिक प्रकारांविरूद्ध कारवाई करायला पोलीस आयुक्त का घाबरतात? - अॅड. काशिनाथ ठाकूर पनवेल आणि नवी मुंबईच्या हद्दीतील डान्स बार, हॉटेल, लॉजिंग याठिकाणी वेश्या व्यवसाय तेजीत सुरू असून या परिसरात अनैतिक प्रकारांना उधाण आल्याचे चित्र समोर दिसू लागले असून या परिसरात कायदा आणि सुव्यवस्था ढासळण्याच्या मार्गावर आलेली आहे. येथील अनैतिक प्रकारांविरूद्ध कारवाई करायला नवी मुंबई पोलीस आयुक्त का घाबरतात? असा सवाल प्रहार जनशक्ती पक्षाचे सरचिटणीस अॅड. काशिनाथ ठाकूर यांनी उपस्थित केला आहे. पनवेल येथील जगदंबा बार, चाणक्य बार, कपल बार, ग्रिट्स बार, कोनगाव येथील टायटन, नाईट रायडर, चांदणी, मूननाईट, स्वामी, माया बार, बिनधास्त, आयकॉन, बाँबे बार, कळंबोली येथील तानसा बार, कॅप्टन बार, तळोजा येथील चंद्रविलास बार, तसेच कमल पंजाब अँड महाराष्ट्र बार, निसर्ग बार, कोन येथील नटराज बार (व्ही.आय.पी. रूम), साई दर्शन बार (पहिला मजला), वेल्वेट बार (रात्री २ नंतर) येथे वेश्या व्यवसाय सुरू, कोपरखैरणे येथील बेला, सावली, रबाळे एम.आय.डी.सी. येथील संगम, मूड, सेल्फी, मायरा, विटावा, सूरसंग