महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टींग असोसिएशन
महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टींग असोसिएशन क्रीडा व युवक सेवा संचालनाच्या निर्णयामुळे" शिवछत्रपती पुरस्कार साठी तरुण खेळाडूंचे भविष्य अंधारात*"--संजय सरदेसाई, सरचिटणीस ,महाराष्ट्र स्टेट पॉवरलिफ्टिंग असोसिएशन आपल्या कामगिरीने महाराष्ट्रात भारतामध्ये व जगामध्ये तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतास सर्वाधिक पदक मिळवून देणारा *पॉवरलिफ्टिंग*या खेळास राज्य क्रीडा व युवक संचालनालय विभागाच्या हुकूमशाही व एकाधिकारशाही मुळे या खेळास राज्य क्रीडा मंत्रालयाने वगळण्याचा निर्णय घेतला आहे. .या खेळाबरोबरच शरीर सौष्ठव,कॅरम, बिलियर्डस - स्नूकर, अश्वारोहण, गोल्फ व याटिंग आदी सात खेळ या पक्तीत घेतले आहेत. पॉवरलिफ्टींग या खेळाच्या अखिल भारतीय विद्यापीठ, अखिल भारतीय पोलीस,अखिल भारतीय सिव्हील सर्विसेस, अखिल भारतीय वनविभाग ,अखिल भारतीय कौल इंडिया,अखिल भारतीय पोस्टल विभाग, अखिल भारतीय शालेय अजिंक्यपद यांच्या स्पर्धांचा आयोजन केले जाते .त्यामध्ये महाराष्ट्राचे सर्वाधिक खेळाडू सहभागी होत असतात व आपल्या कामगिरीने खेळाडू महाराष्ट्राचे नाव मोठे करत असतात कारण या खेळाडूंना त्या विभागात खेळाडू म