विकासासोबत रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी संधी द्या-प्रितम म्हाञे

 



विकासासोबत रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी संधी द्या-प्रितम म्हाञे

उरण : पनवेल तालुक्यातील पोसरी, गिरवले, नारपोली सावळा या भागात आ. विवेक पाटील यानी भरीव विकासाची कामे केली असून त्यानंतर माञ आलेल्या लोकप्रतिनीधीचे या भागाकडे दुर्लक्ष झाले. हा विकासाचा गॅप आपल्याला भरून काढून तालुक्याचा रोजगाराचा प्रश्न सोडवायचा आहे त्यासाठी शिट्टीच्या चिन्हासमोरील बटण दाबून आपल्याला संधी द्यावी असे प्रतिपादन उरण विधानसभेचे उमेदवार प्रितम म्हाञे यानी केले.

        शेकाप उमेदवार प्रितम म्हात्रे यानी कष्टकरीनगर पोसरी, नारपोली, गिरवले, सावळा, देवळोली, कसळखंड, भाताण गावात निवडणूक दौरा केला. त्यावेळी गावागावातून त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. दौऱ्यात त्यांच्यासोबत नारायणशेठ घरत, मनोहर पाटील, जगदिश पवार, सचीन ताडफळे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रितम म्हात्रे म्हणाले की युवकाच्या रोजगाराचा प्रश्न आज गंभीर आहे तो सोडविण्यासाठी आपण प्रशिक्षण सुरू केले असून विमानतळात 44 जणाना नोकऱ्या मिळवून दिल्या आहेत. भविष्यात ही संख्या मोठी असेल हे काम मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी आपण मला संधी द्यावी. असे आवाहन प्रितम म्हात्रे यांनी केले. यावेळी आपच्या संघटन मंञी डा.शेख यानी प्रितम म्हाञे याना पक्षाचा जाहीर पाठिंबा असल्याचे पञ दिले. 




प्रितम म्हाञे यांचा जलवा, तरूणाई एकवटली

उरण : सिडकोच्या माध्यमातून उरण वेगाने विकसित होत असताना योग्य प्रशिक्षणाअभावी तरूणाच्या हाताला काम मिळत नसल्याने भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. या तरूणाचे भविष्य उद्थ्वस्त होवू नये यासाठी प्रितम म्हाञे यानी जे एम म्हाञे ट्रस्टच्या माध्यमातून युवकाना प्रशिक्षीत करण्याचे काम हाती घेतले आहे. गेल्या काही महिन्याच्या परिश्रमानंतर येथून प्रशिक्षण घेतलेल्या 44 तरूण तरूणीना विमानतळात नोकऱ्या मिळाल्याने तरूणाईत आशादायी वातावरण निर्माण होवून सारी तरूणाई त्यांच्या मागे एकवटली असल्याचे चिञ पहायला मिळत आहे.

       उरण विधानसभा निवडणूक प्रचारासाठी प्रितम म्हात्रे यांनी उरण तालुक्याचा दौरा केला. त्याप्रसंगी तरूणाईने एकच जल्तोष करून त्याच्या या अभूतपुर्व कार्याची पोच पावती दिली. यावेळी पक्षाचे जेष्ठ नेते जे एम म्हाञे, नारायणशेठ घरत, पांडूमामा घरत, अनिल ढवळे, रमाकांत घरत, जितेंद्र घरत, सचीन ताडफळे, माधव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

       यावेळी तरूणाईला मार्गदर्शन करताना सचीन ताडफळे म्हणाले की आज युवकाना दिशा देण्यासाठी तरूणाईला रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या युवा नेतृत्वाची गरज आहे. आपले दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवार रिटायरमेटला आले असून त्याना मतदारानी पेन्शनवर पाठवून प्रितम म्हाञे याना आपले प्रतिनिधीत्व करण्यासाठी विधानसभेत पाठवावे. अनिल ढवळे यानी निष्क्रीय विरोधकाचा समाचार घेताना स्थानिक आगरी, कोळी, कराडी याना अस्मिता दाखविण्याचे आवाहन केले. तसेच भुमी पुञाचा अवमान करण्याचे काम येथील आमदारानी केले असून त्याचा त्याना जबाब त्याना द्यावा लागेल.असे सागितले

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर