# शरद पवार म्हसळ्यात येणार...अनिल नवगणे यांच्या प्रचारार्थ १६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता म्हसळा (म्हसळा-बोर्ली पंचतन रस्ता) येथे सभा आयोजित # लोकांचा कल परिवर्तनाकडे दिसत असून आम्हाला चांगलं यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत होणार आहे

 



# शरद पवार म्हसळ्यात येणार...अनिल नवगणे यांच्या प्रचारार्थ १६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता म्हसळा (म्हसळा-बोर्ली पंचतन रस्ता) येथे सभा आयोजित 

# लोकांचा कल परिवर्तनाकडे दिसत असून आम्हाला चांगलं यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत होणार आहे


श्रीवर्धन/प्रतिनिधी 


श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल नवगणे यांच्या प्रचारार्थ १६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता म्हसळा (म्हसळा-बोर्ली पंचतन रस्ता) येथे सभा आयोजित करण्यात आली आहे.या सभेसाठी गुहागर विधानसभा मतदार संघाचे आमदार भास्कर जाधव उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हसळा तालुका अध्यक्ष अजहर धनसे यांनी दिली आहे.

       सभेच्या माध्यमातून श्रीवर्धन मतदारसंघात निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे.महाविकास आघाडी तर्फे श्रीवर्धन विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला जागा मिळाली असून महाविकास आघाडीतर्फे अनिल नवगणे यांना उमेदवारी मिळाली आहे.आगामी विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार असल्याने आता प्रचाराला चांगलाच वेग आला आहे.या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना होत आहे.यामुळे दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात प्रचाराचा झंझावत पाहायला मिळणार आहे.

        श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात महायुती तर्फे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या उमेदवार आदिती तटकरे या निवडणूक लढवीत आहेत.राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट असा सामना श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात रंगणार आहे.यामुळे शरद पवार व भास्कर जाधव सभेला नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सभे दरम्यान श्रीवर्धन तालुक्यातील महायुतीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत.


Like करा, Share करा, Subscribe करा.

------------------------

सामान्य जनतेचे लोकमत

रायगड मत 

संपादक - जितेंद्र नटे

Mo. 8652654519

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर