महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांना आम आदमी पार्टीचा पाठिंबा
महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांना आम आदमी पार्टीचा पाठिंबा
पनवेल: महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांना आम आदमी पार्टीने जाहीर पाठिंबा दिला आहे. बाळाराम पाटील यांना विविध पक्षांचा पाठिंबा मिळत असल्याने त्यांची ताकद वाढली आहे.
आम आदमी पार्टी तर्फे महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक 2024 रायगड जिल्हा करता महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाला बिनशर्पात ठिंबा दिला असल्याचे पत्र डाॅ. रियाझ पठाण - प्रदेश संघटन मंत्री - महाराष्ट्र राज्य, यांनी दिला आहे. यावेळी ॲड. जयसिंग जगन्नाथ शेरे, समन्वयक- पनवेल विधानसभा, चिमाजी शिंदे - संघटन मंत्री - पनवेल विधानसभा यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. पनवेल विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी तर्फे बाळाराम पाटील हे निवडणूक लढवत आहे. त्यांच्या प्रचाराला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, आंबेडकर चळवळीतील इतर सहकारी पक्ष यांनी पाठिंबा दिला आहे.
Comments
Post a Comment