नैना संदर्भात तातडीने बैठक घ्या - आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची मागणी
नैना संदर्भात तातडीने बैठक घ्या
- आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची मागणी
पनवेल (प्रतिनिधी)
नैना प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीसंदर्भात तातडीने बैठक आयोजित करण्याची आग्रही मागणी पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांनी सिडकोकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात शेतकऱ्यांची भूमिका मांडताना म्हंटले आहे कि, सिडको मार्फत नैना नियोजन प्राधिकरण हद्दीतील अनेक घरे अथवा बांधकामांना अनधिकृत असल्याबाबत निरनिराळया वेळी अनेक नोटीस देण्यात आल्या आहेत. वस्तुतः ही सर्व घरे शेतकऱ्यांनी स्वतःच्या जागेत बांधली असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा म्हणजे शेतकऱ्यांच्या अधिकारावर होणारे अतिक्रमण आहे. यासंदर्भात वारंवार सुचना देऊनही प्राधिकरणामार्फत एखाद्या जुलुमशहाप्रमाणे सिडको प्राधिकरणाची वागणूक दिसून येत आहे. सिडकोला जर नैना परिसरात विकास करायचा असेल तर शेतकऱ्यांना कस्पटासमान वागणूक देऊन सिडको सहकार्याची अपेक्षा करू शकत नाही म्हणुनच यापुढे नैना क्षेत्रात विकास कामासंदर्भात कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी पुढील कार्यवाही संदर्भात माहिती देण्यासाठी प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीसोबत तातडीने एका बैठकीचे आयोजन करावे अशी मागणी त्यांनी या निवेदनातून केली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या संदर्भात अन्यायकारी भूमिका घेतल्यास सिडको प्रशासनाविरोधात उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा ईशाराही आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी सिडकोला दिला आहे.
Comments
Post a Comment