महाराष्ट्र राज्यात लाडकी बहिण योजनेच्या अंमलबजावणीसाठी किंगमेकर ठरलेल्या अदिती तटकरे तब्बल ११६०५० मतांनी विजयी

 



महाराष्ट्र राज्यात लाडकी बहिण योजनेच्या अंमलबजावणीसाठी किंगमेकर ठरलेल्या अदिती तटकरे तब्बल ११६०५० मतांनी विजयी

म्हसळा / प्रतिनिधी 

एकतर्फी विजय मिळवताना आदिती तटकरे यांनी ८२७९८ मताधिक्य घेत प्रथमतच श्रीवर्धन मतदार संघात इतक्या मोठ्या फरकाने विजय प्राप्त करण्याचा इतिहासात नोंद झाली आहे. ना भूतो न भविष्यती असा विजय, अब की बार ऐक लाख पार करीत महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळातील एकमेव महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात दणदणीत विजय मिळवला आहे. 


महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अंमलबजावणीसाठी किंगमेकर ठरलेल्या आदिती तटकरे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शरद पवार गटाचे उमेदवार अनिल नवगणे यांचा तब्बल ८२७९८ मतांनी पराभव केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार आदिती तटकरे यांना ११६०५० मत तर नवगणे यांना अवघी ३३२५२ मत मिळाली आहेत.काँग्रेसचे बंडखोर उमेदवार राजाभाऊ ठाकुर यांना ४०८०,बहुजन समाज पार्टीच्या अश्विनी साळवी यांना ७१८, मनसेचे फैजल पोपेरे २१२५,कुणबी समाज नेते बळीराज सेनेचे कृष्णा कोबनाक यांना अवघी ४९० मत मिळाली आहेत. अन्य पाच अपक्ष उमेदवारांना २७४० आणि नोटाला ३३७५ मत पडली आहेत.मतदार संघात झालेल्या ५८ टक्के मतदानात अर्थात २६५३५४ मतदाना पैकी आदिती तटकरे यांनाच ११६०५० मत मिळाली अर्थात ४३ टक्के मताधिक्य मिळाले आहे.महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात विजयाचा पहिला निकाल श्रीवर्धन मतदार संघाच्या आमदार आदिती तटकरे यांचा लागला.या वेळी विजयाचा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत गुळाल उधळत विजयाचा एकच जल्लोष केला.नवनियुक्त आमदार आदिती तटकरे आणि युवा नेते माजी आमदार अनिकेत तटकरे यांना युतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी खांद्यावर उचलुन, अलींगण देत ढोल ताशांच्या गजरात आनंद साजरा केला.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर