आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयाचा आशिर्वाद; ग्रामीण भागातील प्रचार दौऱ्यात भरभरून स्वागत

 






आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयाचा आशिर्वाद; ग्रामीण भागातील प्रचार दौऱ्यात भरभरून स्वागत 


पनवेल (प्रतिनिधी) पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कतृत्वत्वान नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर हे चौथ्यांदा विजयासाठी सज्ज झाले आहेत. त्या अनुषंगाने भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय, पीआरपी आणि मित्र पक्ष महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोमाने त्यांचा प्रचार करत असून मतदारांचा विजयाचा आर्शिवाद आमदार प्रशांत ठाकूर यांना मिळत आहे.

           पनवेल विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांचा झंझावात प्रचार सुरु आहे. त्यानुसार मतदार संघातील नागझरी, ढोंगऱ्याचा पाडा, पाले खुर्द, देविचापाडा, तोंडरे, 

पडघे, नावडे गाव, नावडे कॉलनी, खिडूकपाडा, टेंभोडे आणि वळवली गावात महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांसह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचार केला. प्रत्येक ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूर यांचे रांगोळी 

काढून आणि औक्षण करून स्वागत करण्यात आले. तसचे ज्येष्ठांनी त्यांना विजयाचा आर्शिवाद दिला.युवकांनी देखील जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता. 

        या प्रचारावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस भूपेंद्र पाटील, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, शशिकांत शेळके, मारुती चिखलेकर, युवामोर्चाचे रायगड जिल्हा सरचिटणीस दिनेश खानावकर, प्रभाग क्रमांक २ चे अध्यक्ष कृष्णा पाटील, नारायणशेठ पाटील, सुरेशशेठ खानावकर, वासुदेवशेठ पाटील, महेश पाटील, अशोक पाटील, श्रीनाथ पाटील, शुभम खानावकर, आशिष कडू, पवन भोईर, भारत म्हात्रे, समीर गोंधळी, सागर भोईर, गौरव भोईर, अशोक शेठ साळुंखे, काळूरामशेठ फडके, महेंद्र म्हात्रे, आकाश फडके, करण फडके, रामदास शेठ फडके, सुदेश फडके, विशाल खानावकर, मदन खानावकर, रुपेश खानावळ, रुपेश खानावकर, प्रशांत खानावकर, राम म्हात्रे, संतोष म्हात्रे, राजेश पाटील, जितू काटकर, आनंद सोनवणे, रवींद्र खानावकर, राकेश खानावकर, विनीत खानावकर, धीरज खानावकर, स्वराज खानावकर, राम बुवा खुटारकर, तुषार खानावकर, प्रभाकर खानावकर, तुकाराम खानावकर, महेश म्हात्रे, रोहित उलवेकर, प्रेमनाथ खानावकर, गजानन पाटील, के.टी. भोईर, दिलीप भोईर, यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या प्रचारात सहभागी झाले, होते.


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर