जे. एम. म्हात्रे कुटुंबीयांची पत्रकारांसोबत दिवाळी

 


जे. एम. म्हात्रे कुटुंबीयांची पत्रकारांसोबत दिवाळी

उरण : समाजामध्ये घडणाऱ्या सर्व प्रकारच्या घडामोडी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी २४ तास निःस्वार्थीपणे काम करणारा पत्रकार हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. उरण, पनवेल, रायगड जिल्ह्यासह नवी मुंबईमधील पत्रकार योग्यतेने काम करत आहेत. पत्रकारांनी समजहितासाठी काम करून समाजात आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे पत्रकारांप्रति आदर, प्रेम बाळगत व एक कुटुंब म्हणून म्हात्रे कुटुंबातर्फे दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्हा खजिनदार प्रीतम जनार्दन म्हात्रे यांनी सांगितले.

    २ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता रंजना बंगला, जे. एम. म्हात्रे यांच्या कोपर गाव येथील निवासस्थानी पत्रकारांसाठी दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रीतम म्हात्रे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांच्या कार्याबाबत समाधान व्यक्त करत उपस्थित सर्व पत्रकारांचे स्वागत केले. या प्रसंगी जे. एम. म्हात्रे, ज्येष्ठ नेते नारायण घरत यांनीही पत्रकारांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पत्रकारांचे प्रतिनिधी म्हणून ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, ज्येष्ठ पत्रकार मंदार दोंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी एका चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगत जे. एम. म्हात्रे, प्रीतम म्हात्रे यांचे आभार मानले. या प्रसंगी सर्व पत्रकारांनी जे. एम. म्हात्रे, प्रीतम म्हात्रे व त्यांच्या कुटुंबीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. 


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर