गरज तिथे नोकरी...प्रितमदादा म्हाञे

 




गरज तिथे नोकरी...प्रितमदादा म्हाञे

उरण : आमच्या भुमीपुञाची तरुण मुले शिकलेली आहेत माञ त्याच्याकडे आवश्यक प्रशिक्षण नसल्याने या तरूणाना पाञता असूनही नोकरी मिळत नाही. त्यामुळे हा तरूण निराश झाला आहे. त्या तरूणाना योग्य प्रशिक्षण देवून त्याला नोकरी मिळविण्यासाठी सक्षम करण्याचे काम हाती घेतले आहे. येथील बेरोजगाराची समस्या दूर करण्यासाठी आता गरज तिथे नोकरी हेच धोरण अवलंबण्याचा निर्धार आपण केला असल्याचे स्पष्ट प्रतिपादन प्रितमदादा म्हाञे यांनी केले.

    उरण विधानसभा निवडणुकीच्या निमीत्ताने प्रितमदादा म्हात्रे यानी दिघोडे येथे मतदारांच्या गाठभेठी घेऊन दौरा केला. त्यावेळी ते मतदाराशी हितगुज करताना बोलत होते. या कार्यक्रमासाठी सरपंच किर्तीनिधी ठाकूर, बंडाशेठ, जितेंद्र म्हाञे, महेश साळुंखे, शिवाजी काळे उपस्थित होते. यावेळी दिघोडे ग्रामस्थांच्या वतीने प्रितमदादा म्हाञे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या वेळी बोलताना म्हणाले की येथील युवकाना रोजगाराची भिषण समस्या भेडसावत आहे रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासठी आपण रोजगाराभिमुख प्रशिक्षण सुरू केले आहे. या माध्यमातून मुंबई एअर पोर्टवर 44 नोकऱ्या देण्यात आपण यशस्वी झालो आहोत. उद्या जर आपल्याला आमदारकीची संधी मिळाली तर आपण तरूणाना मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या उपलब्ध करून देवू. त्यासाठी 100 दिवसात 1000 नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. येथील आमदारानी गेल्या 5 वर्षात कुठलेच विकासकाम न करता केवळ थापा मारण्याचे काम केले आहे

    आपल्यालाच आपले प्रश्न सोडवायचे आहेत त्यासाठी आपल्यातल्या माणसाला विजयी करावे असे आवाहन म्हात्रे यांनी केले. आणि उद्या शिट्टी जोरात वाजली तर हा आवाज वाया जावू देणार नाही असे म्हात्रे यांनी सांगितले.


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर