गरीब गरजू लोकांना फराळ वाटून रिद्धी कॉम्प्युटर इंस्टिट्यूटने साजरा केला दिवाळी सण




गरीब गरजू लोकांना फराळ वाटून रिद्धी कॉम्प्युटर इंस्टिट्यूटने साजरा केला दिवाळी सण 

पनवेल / प्रतिनिधी 

आनंदाची दिवाळी दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचं प्रतीक, दिवाळी ओळखली जाते ती मेजवानीने,फटाक्याच्या रोषणायीने आणि रंगीबेरंगी रांगोळीने. दिवाळीत माणसं एकत्र भेटतात, एकमेकांना हस्तादोलन करतात आणि लाडू शंकरपाळी गोडदोड खात दिवाळीचा सण साजरा करतात. आणि अगदी तसाच सण साजरा केला तो म्हणजे महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त रिद्धी कॉम्प्युटर इंस्टिट्यूटने किंबहुना एक पाहुल पुढे जात विंदाच्या भाषेत म्हणायचं तर देणार्‍याने देत जावे घेणार्‍याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणार्‍याचे हात घ्यावे." म्हणजे काय तर उपकार अजिबात नाही या उलट देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे देणाऱ्याचा दानशुरपणा आपण आपल्या अंगी बाणावा आणि समाज म्हणून कासवाच्या गतीने का होईना जितकं आपण निसर्गाकडून घेतोय त्याचा खारीचा वाटा का होईना ते परत करण्याचा प्रयत्न असावा इतकंच आणि म्हणूनचं हि आनंदाची दिवाळी साजरी करण्याचा खटाटोप. आपणा सर्वांना रिद्धी कॉम्प्युटर इंस्टिट्यूट परिवारातर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ..!

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर