# हवा कुणाची? श्रीवर्धन मतदार संघात चाललंय काय? हा घ्या आढावा. # आगामी निवडणुकीत सर्वांच्या सहकार्याने महाविजय संपादन करणार - अदिती तटकरे # लाडकी बहीण योजनेमुळे अदिती ताई महाराष्ट्राच्या घराघरात पोहचल्या आहेत. महिलांचा प्रचंड पाठींबा त्यांना मिळत आहे. # एकूण 2 लाख 65 हजार 286 मतदार आहेत. यापैकी 1 लाख 29 हजार 918 पुरुष, 1 लाख 35 हजार 368 महिला मतदार आहेत. # रेकॉर्ड ब्रेक 1 लाखाच्या वर अदिती तटकरे यांना मतदान होईल असा अंदाज आहे. # स्थानिक आणि मुंबईकर मतदारांशी थेट संपर्क अदिती तटकरे यांचाच जास्त आहे. त्यामुळे सध्यातरी हवा अदिती तटकरे यांचीच जास्त आहे.
# हवा कुणाची? श्रीवर्धन मतदार संघात चाललंय काय? हा घ्या आढावा.
# आगामी निवडणुकीत सर्वांच्या सहकार्याने महाविजय संपादन करणार - अदिती तटकरे
# लाडकी बहीण योजनेमुळे अदिती ताई महाराष्ट्राच्या घराघरात पोहचल्या आहेत. महिलांचा प्रचंड पाठींबा त्यांना मिळत आहे.
# एकूण 2 लाख 65 हजार 286 मतदार आहेत. यापैकी 1 लाख 29 हजार 918 पुरुष, 1 लाख 35 हजार 368 महिला मतदार आहेत.
# रेकॉर्ड ब्रेक 1 लाखाच्या वर अदिती तटकरे यांना मतदान होईल असा अंदाज आहे.
# स्थानिक आणि मुंबईकर मतदारांशी थेट संपर्क अदिती तटकरे यांचाच जास्त आहे. त्यामुळे सध्यातरी हवा अदिती तटकरे यांचीच जास्त आहे.
श्रीवर्धन / जितेंद्र नटे
दिवाळीचे फटाके जरी फुटून संपले असले तरी राजकीय फटाके अजून बाकी आहेत. येत्या काही दिवसांत ते सर्वत्र फुटतील. अगदी रखरखत्या उन्हात सगळे फिरत आहेत. मतदारांना पहिला कोण भेटतो याची एक स्पर्धाच असते. अहो जिथे विरोधी पक्षाला उमेवारच सापडेना अशी अवस्था झाली त्या मतदार संघात बिनविरोध होते की काय अशी चर्चा होऊ लागली होती.
राष्ट्रवादी शरद पवार गट आणि कृष्णा कोंबनाक हे बळीराज सेनेतर्फे उभे आहेत मात्र यांचा मतदार संघात अजून प्रचाराचा जोर दिसत नाही. मात्र अदिती तटकरे यांनी अर्धा मतदार संघ 5 तालुके पिंजून काढले आहेत. जनसंपर्क हा तटकरेंचा हातखंडा आहे. असा कुठला गाव नाही जिथे अदिती तटकरे, सुनील तटकरे, अनिकेत तटकरे पोहचले नाहीत. असा कुठला गाव नाही जिथे समाज सभागृह बांधला नाही. गेली पाच वर्षे मतदार संघातील प्रत्येक गावाशी त्यांचा थेट संपर्क आहे. प्रत्येक गावात त्यांनी एकतरी विकास काम टाकले आहे. त्यामुळे त्यांना तिथे जाता येत आहे. नुकत्याच त्या मौजे दिघी ता. श्रीवर्धन येथे दीपावली निमित्त स्वराज्य क्रिकेट क्लब दिघी यांच्या वतीने आयोजित साई उत्सव सोहळ्यात सहभागी होण्याचा सन्मान त्यांना मिळाला. या कार्यक्रमात त्यांच्या सोबत सर्व ग्रामस्थ, महिला मंडळ, पदाधिकारी, कार्यकर्ते व अन्य मान्यवर उपस्थित होते. आपुलकीच्या या कार्यक्रमाने गावाच्या एकतेची भावना अनुभवायला मिळाली असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केली.
श्रीवर्धन तालुक्यातील दिघी पंचायत समिती गणातील मौजे भावे, कुडकी, वेळास, वेळास आगार, आदगाव, सर्वे, नानवली या गावांमध्ये निवडणूक नियोजनाची बैठक घेत विकास्कामाबद्दल चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे लाडकी बहीण योजनेमुळे अदिती ताई महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली आहे. गावातील नागरिकांसोबत संवाद साधून त्यांच्या अपेक्षा आणि समस्या जाणून घेत आगामी निवडणुकीत सर्वांच्या सहकार्याने न भूतो न भविष्यतीअसा महाविजय संपादन करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
स्थानिक आणि मुंबईकर मतदारांशी थेट संपर्क अदिती तटकरे यांचाच जास्त आहे. त्यामुळे सध्यातरी हवा अदिती तटकरे यांचीच जास्त आहे.
Comments
Post a Comment