# अदिती तटकरे यांनी म्हसळ्यात उडवला प्रचाराचा धुरळा # तब्बल १६ गाववाड्या काढल्या पिंजून, प्रत्यक्ष लोकांना भेटून जाणून घेतल्या समस्या, ग्रामस्थांनी दिल्या विजयाच्या शुभेच्छा # लाडक्या बहिणींना आता 1500/- नव्हे तर मिळणार पुढे 2100/- रु. म्हणजे वर्षाला चक्क 25,200/- रु.
# अदिती तटकरे यांनी म्हसळ्यात उडवला प्रचाराचा धुरळा
# तब्बल १६ गाववाड्या काढल्या पिंजून, प्रत्यक्ष लोकांना भेटून जाणून घेतल्या समस्या, ग्रामस्थांनी दिल्या विजयाच्या शुभेच्छा
# लाडक्या बहिणींना आता 1500/- नव्हे तर मिळणार पुढे 2100/- रु. म्हणजे वर्षाला चक्क 25,200/- रु.
म्हसळा / जितेंद्र नटे
मतदानाला काही दिवस उरले आहेत. जसे जसे दिवस कमी होत आहेत तस तसें वातावरण तापत आहे. अगोदर पासूनच अदिती तटकरे यांचा जनसंपर्क आहे. त्यामुळे त्यांचे प्रत्येक गाव वाडीत स्वागतच होत आहे. असा कुठला गाव नाही, असा कुठला समाज नाही जिथे सुनिल तटकरे साहेबांचे काम नाही. प्रत्येक गाव वस्तीवर एकतरी काम आहेच. म्हणून ते लोकप्रिय आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत अदिती तटकरे नी सुद्धा लोकांना आपले पणाच्या प्रेमळ स्वभावामुळे जवळ केले आहे, किंबहुना त्या लोकांना आपल्या कुटूंबातीलच वाटतात. एकीकडे त्यांचा प्रचाराचा जोर वाढलेला दिसतो आहे मात्र विरोधक कुठे फिरताना दिसत नाहीत.
आज १९३ श्रीवर्धन मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) शिवसेना,भाजप युतीच्या लाडक्या उमेदवार आदिती तटकरे यांच्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी उडवून दिली. म्हसळा तालुक्यातील वरवठणे पंचायत समितीचे गणात सकाळी ११ वाजले पासुन सायंकाळी उशिरा पर्यंत तब्बल १६ गाववाडीत बैठका केल्या.
अनेक लोकउपयोगी योजना त्यांनी पटवून दिल्या. या सर्व ठिकाणी ग्रामस्थ आणि मतदारांनी आदिती तटकरे यांचे भव्य स्वागत करून निवडणूकीत एक मुखी पाठिंबा देत त्यांना भरघोस मतांनी विजयी होण्याच्या शुभेच्छा दिल्या. आयोजीत गाव बैठकीत वरवठणे कोंड, साळविडे बागाचीवाडी, देवळाचीवाडी, ताडाचीवाडी, तोडसुरे जंगम वाडी, तोंडसुरे, खारगाव खुर्द, जांभुळ, चंदनवाडी,
वाडांबा, नेवरुळ, रुदवट, घुम, कोकबल, अनंत वाडी, ठाकरोली, सांगवड या ठिकाणी निवडणूक प्रचाराची बैठक संपन्न झाल्या
Comments
Post a Comment