# अब की बार मतदान 1 लाख पार, अदिती तटकरे यांचा प्रचाराचा जबदस्त झंझावात... # तब्बल 5 तालूके - गाववाड्या काढल्या पिंजून, प्रत्यक्ष लोकांची भेट घेतली. # लोकांचे भरभरून भेटत असणारे प्रेम पाहून पुन्हा विजयाचा गुलाल उधळणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला # यंदाची विधानसभा निवडणूक ही विकासाचे व्हिजन विरुद्ध कुठे आश्वासनांचा पाऊस अशी निवडणूक आहे.

 




# अब की बार मतदान 1 लाख पार, अदिती तटकरे यांचा प्रचाराचा जबदस्त झंझावात...

# तब्बल 5 तालूके - गाववाड्या काढल्या पिंजून, प्रत्यक्ष लोकांची भेट घेतली.

# लोकांचे भरभरून भेटत असणारे प्रेम पाहून पुन्हा विजयाचा गुलाल उधळणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

# यंदाची विधानसभा निवडणूक ही विकासाचे व्हिजन विरुद्ध कुठे आश्वासनांचा पाऊस अशी निवडणूक आहे.

म्हसळा / जितेंद्र नटे 

गेली 15 वर्षे जी विकासकामे केली गेली आहेत त्या विकासकामांना पाहून जनता भरभरून मतदान करतील अशी अपेक्षा व्यक्त करत असताना यंदाची विधानसभा निवडणूक ही विकासाचे व्हिजन विरुद्ध कुठे आश्वासनांचा पाऊस? अशी निवडणूक आहे. महायुती सरकारने केवळ आश्वासने न देता आपल्या कर्तृत्वातून आपलं व्हिजन सिद्ध केलं आहे. महायुतीच्या धोरणांवर विश्वास ठेवत श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील नागरिक पुन्हा एकदा मला भरभरून आशीर्वाद देतील हा मला विश्वास आहे. 


याच विश्वासाने 193 श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील बागमांडला पंचायत समिती गणातील मौजे निगडी काठी, निगडी मोहल्ला, निगडी गौळवाडी, सायगाव गौळवाडी, सायगाव, काळींजे, वावेलवाडी, बागमांडले येथे नागरिकांसोबत संवाद साधण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.


महाराष्ट्र राज्यात संपन्न होत असलेल्या विधानसभा निवडणुक मतदान प्रकियेचे आणि पक्ष उमेदवारांचे प्रचाराचे शेवटचे पाच दिवस शिल्लक असताना या निवडणुकीत आपले नशीब आजमावत आसलेल्या उमेदवारांचे गाव वाडी शहरात प्रचार करण्याचे रणधुमाळीचा जोर वाढला आहे. म्हसळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीच्या उमेदवार आदिती तटकरे यांनी पंचायत समितीच्या चार गणांपैकी वरवठणे आणि मेंदडी पंचायत समितीच्या गणात एकाच दिवशी १५ गाव बैठक घेऊन प्रचार मोहिमेचे चौथेपर्व पुर्ण केले आहे.संपन्न गाव बैठकीत मंत्री तथा महायुतीच्या उमेदवार आदिती तटकरे यांनी श्रीवर्धन मतदार संघात सर्वांगीण विकास कामे करणाऱ्या आपल्या घरातीलच लाडकी लेक, लाडकी बहीण,लाडकी नात आहे असे समजुन मला २० नोव्हेंबर रोजी होणारे मतदानाचे दिवशी घडयाळ चिन्हा समोरील बटन दाबून भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी आशिर्वाद द्या अशी विनंती केली.मतदार संघात विरोधी पक्षांतील उमेदवारांनी गावा गावात काहीच काम केले नाहीत किंवा कोणत्याही अडीअडचणीला धावत नाहीत त्यांना आम्ही केलेली मदत आणि काम दाखवा आणि मत मागायचा अधिकार आहे का ते विचारा.जसे लोकसभेला साहेबांना दोन वेळा खासदार होण्यासाठी आशिर्वाद दिलात तसाच आशिर्वाद आपल्या गावाचा अधिक विकास करण्यासाठी आणि पुन्हा तुमच्या हक्काचा आमदार निवडून आणण्यासाठी मला 


मतदान करून विजयी करा असे आवाहन केले. आयोजीत गाव बैठकीला आदिती तटकरे यांच्या समावेत तालुका अध्यक्ष समीर बनकर,जिल्हा चिटणीस महादेव पाटील,मुंबई निवासी ता.अध्यक्ष महेश शिर्के,जमीरभाई नजीर,महीला अध्यक्षा मिना टिंगरे,माजी सभापती छाया म्हात्रे,शिवसेना तालुका प्रमुख प्रसाद बोर्ले,भाजपचे जिल्हा चिटणीस निलेश मांदाडकर,जेष्ठ नेते चंद्रकांत खोत,नगरसेवक सुनिल शेडगे,महेश पाटील,प्रकाश गानेकर,महेश घोले,महेश पाटील,रियाजभाई फकिह,मुंबई विभाग रा.कॉ.संघटक महेश पाटील,रेखा धारिया,रेश्मा काणसे,शिवसेना महीला प्रमुख गौरी करडे,भाजप महिला अध्यक्षा सुगंधा पाटील,गण अध्यक्ष मोरेश्वर पाटिल,अनिल टिंगरे,संगीता सुर्यवंशी,श्रीमती सुतार, पाटुकले,


आदी मान्यवर उपस्थित होते. आयोजीत गाव बैठकीत पेडांबे,वरवठणे मोहल्ला,आगरवाडा,रेवळी,गणेशनगर, खरसई,मेदङी कोळीवाडा,मेदङी आगरी समाज, मेंदडी मुस्लिम समाज, मेंदडी कोंड,मेंदडी,आदिवासीवाडी,गोंडघर,वारळ,काळसुरी,तुरुंबाडी, रोहिणी,आडी ठाकुर या १८ गाववाडीत प्रचार बैठक संपन्न झाल्या.ठिकठिकाणी ग्रामस्थांनी सुरवातीला उमेदवार आदिती तटकरे यांचे स्वागत केले.त्यांनी युतीच्या सरकारमध्ये केलेले लोकपयोगी विकास कामे आणि थेट लाभाच्या योजना खास करून महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आदी योजनांची अंमलबजावणी या बाबत माहिती दिली.निवडणूकीत मला आपली लाडकी लेक,लाडकी बहिण,लाडकी नात समजुन भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर