# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

 



# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप"

# मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप

# शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव

# अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार.

# श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत. 

रायगड मत / जितेंद्र नटे 

raigadmat.page 


रायगड मध्ये शिवसेना (उबाटा) चे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे उद्या फॉर्म भरणा. श्रीवर्धन मतदार संघात चर्चेला एकच उधाण. रायगड दक्षिण शिवसेना उभाठा गटाचे जिल्हा प्रमुख अनिल नवगणे पदाचा राजीनामा देणार. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करून श्रीवर्धन मतदार संघातून तुतारी वाजविणार .

राज्यात सर्वत्र निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन मतदार संघातून राष्ट्रवादी (अजित पवार गट ) महायुति चे उमेदवार आदिती तटकरे यांनी शक्ती प्रदेशन करून अर्ज दाखल करण्यात आला आहे. तर श्रीवर्धन मतदार संघाची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाल मिळाली असून या मतदार संघातून शिवसेना उबाठाने जागे साठी दावा केला होता. मात्र पवार गटाला हि जागा मिळाल्यामुळे येथिल शिव सेनेचे इच्छूक उमेदवार जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांना उमेदवारी ची तिकीट न मिळाळ्याने त्यांनी दिं २७ ऑगस्ट २०२४ रोजी श्रीवर्धन येथे प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली त्यामधे म्हसळा , श्रीवर्धन तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी उपस्थीत होते यावेळी नवगणे यांनी असे जाहीर केले की मी अनेकदा पक्षप्रमुख यांच्या कडे उमेदवारी करीता प्रयत्न केले. मात्र त्याला यश आले नाही त्यामूळे मी जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देणार आहे व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार असून महाविकास आघाडीच्या lवतीने निवडणूक लढविणार आहे त्यासाठी शिवसेना पदाधिकारी यांचा मला समर्थन मिळावा असे अशी विनंती केली. मात्र पक्षाचा अद्याप आदेश नाही यावर उपस्थित माजी आमदार तुकाराम सूर्वे , उपजिल्हा प्रमुख नंदु शिर्के , श्रीवर्धन मतदार संघाचे संपर्क प्रमुख सुजित तांदलेकर , तालुका प्रमुख अविनाष कोळंबेकर , ता. प्र. निगुडकर ( म्हसळा ) ता प्र . साळवी . माजी सभापती बाबुराव चोरगे , युवासेना म्हसळा अमित महमुणकर , विभाग प्र .हरीचंद्र मळेकर संदिप रिकामे व काही पदाधिकारी यांनी समर्थन देऊन पाठिंबा दर्शविला आहे. यावेळी रविंद्र लाड व म्हसळा श्रीवर्धन तळा तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते मात्र शिवजेना पक्ष प्रमुखांचा आदेश नसताना पक्षाचा आदेश डावळूण केलेले समर्थन यावर पक्षाने कारवाई केल्यास सामोरे जाऊ असे सांगितले जात आहे . मात्र अनिल नवगणे हे आज राष्ट्रवादी ( शरद पवार ) गटामध्ये प्रवेश करून दिं २९ ऑक्टों 2024 रोजी महाविकास आघाडी चा उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार असल्याने समजले. परंतु ऐन निवडणूकी मध्ये जबाबदारी असलेले नवगणे राष्ट्रवादीत गेल्यामुळे, त्याच प्रमाणे त्यांना मिळणारे पदाधिकारी यांचे समर्थन यांवर पक्षाची भुमिका काय याकडे सर्वांचे लक्ष आहे.

श्रीवर्धन मतदार संघात आता राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी हे मतदारच ठरविणार आहेत. 

Comments

Popular posts from this blog

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर