# डायमंड मार्केट वर मंदीचे सावट # हिरामंदीमुळे १५ लाख कामगारांवर बेरोजगारीच कुऱ्हाड # रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग कोकणातील चाकरमानी कामगारांची कुणाला काहीही पडलेली नाही? # कोकणात डायमंड कारखाने सुरु झाले तर अनेक लोकांना गावाकडेच रोजगार-नोकरी मिळू शकते.. पण राजकीय नेत्यांना त्याचे काहीही पडलेले नाही? # कोकणात इंडस्ट्री MIDC मोठे कारखाने नाहीत त्यामुळे नोकरीसाठी अनेक लोक अजूनही मुंबईवरच अवलंबून आहेत. # कोकणात 70 टक्के गावे खाली झाली आहेत. शाळा ओस पडल्या आहेत. # कोकणच्या अ-विकासाला जबादार कोकणी मतदारच जबाबदार # प्रयोगशाळेत तयार केलेले हिरे (लॅबग्रोन) आता नैसर्गिक हि-यांपेक्षा ७० टक्के स्वस्त आहेत. या वस्तुस्थितीचाही हिरे व्यवसायावर परिणाम झाला
# डायमंड मार्केट वर मंदीचे सावट
# हिरामंदीमुळे १५ लाख कामगारांवर बेरोजगारीच कुऱ्हाड
# रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग कोकणातील चाकरमानी कामगारांची कुणाला काहीही पडलेली नाही?
# कोकणात डायमंड कारखाने सुरु झाले तर अनेक लोकांना गावाकडेच रोजगार-नोकरी मिळू शकते.. पण राजकीय नेत्यांना त्याचे काहीही पडलेले नाही?
# कोकणात इंडस्ट्री, MIDC, मोठे कारखाने नाहीत. त्यामुळे नोकरीसाठी अनेक लोक अजूनही मुंबईवरच अवलंबून आहेत.
# कोकणात 70 टक्के गावे खाली झाली आहेत. शाळा ओस पडल्या आहेत.
# कोकणच्या अ-विकासाला जबादार कोकणी मतदारच जबाबदार
# प्रयोगशाळेत तयार केलेले हिरे (लॅबग्रोन) आता नैसर्गिक हि-यांपेक्षा ७० टक्के स्वस्त आहेत. या वस्तुस्थितीचाही हिरे व्यवसायावर परिणाम झाला.
मुंबई : गेल्या दोन वर्षांत हि-याच्या किंमती ३५ ते ४० टक्क्यांनी घसरल्या असून यामध्ये तयार हिं-यांची किंमत ३ वर्षांत ३५% कमी झाली आहे. म्हणजेच एकेकाळी १ लाख किमतीवाल्या हि-यांची किंमत घटून ६५-७० हजार झाली आहे. कच्च्या हि-यांच्या किंमती २५% पर्यंत घसरल्या आहेत, ज्यामुळे व्यापा-यांना १०% पर्यंत तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे लोक आता गुंतवणुकीसाठी हिरे कमी घेत आहेत. गेल्या पन्नास वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे की, हि-यांच्या व्यवसायात सलग दोन वर्षे मंदी आली. मंदीमुळे जी-७ देशांनी रशियन हि-यांवर बंदी घातली होती तसेच चिनी लोकांनी हि-यांऐवजी सोने दागिन्यांची खरेदी सुरू केली.
प्रयोगशाळेत तयार केलेले हिरे (लॅबग्रोन) आता नैसर्गिक हि-यांपेक्षा ७० टक्के स्वस्त आहेत. या वस्तुस्थितीचाही हिरे व्यवसायावर परिणाम झाला आहे. रशिया-युक्रेन आणि इस्रायल युद्धाचा परिणाम हि-यांच्या व्यवसायावरही झाला आहे. जगात पैलू पाडलेले आणि पॉलिश केलेल्या १० पैकी ९ हिरे सुरतमध्ये बनतात. सुरतमध्ये तयार झालेला असा हिरा सुरत आणि मुंबईतून जगातील विविध देशांमध्ये निर्यात होतो. सुरतमध्ये ८ हजार छोटे-मोठे कारखाने हि-यांना पैलू पाडतात आणि पॉलिश करतात. यापैकी बहुतेक कारखाने सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. सुमारे १५ लाख लोकांना रोजगार देणारा हि-यांचा व्यवसाय मंदीचा सामना करत आहे.
युध्दाचा मोठा परिणाम
रशिया-युक्रेन युद्ध, हमास, लेबनॉनमधील युद्ध परिस्थितीमुळे अमेरिकेसह बाजारात मंदीचे सावट आहे. ज्याचा परिणाम सुरत आणि मुंबईसह देशातील हिरे उद्योगावर झाला आहे. २०२१-२२ मध्ये, जेव्हा कोरोनाच्या काळात सर्व उद्योग बंद होते तेव्हा हिरे उद्योगाने इतिहासात सर्वाधिक १.८० लाख कोटी रुपयांच्या हि-यांची निर्यात केली. बरोबर एक वर्षानंतर ५० वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठी मंदी आली, जी अजूनही सुरू आहे.
हि-यांऐवजी सोन्यावर विश्वास
हिरे बाजारात काही कारणांमुळे मंदी आली आहे. युक्रेन-रशिया आणि हमास-इस्रायल यांच्यात पश्चिम आशियात पहिले युद्ध झाले. दुसरे म्हणजे अमेरिका आणि युरोपमधील मंदीचे सावट. मंदीमुळे तयार हि-यांची मागणी कमी झाली त्यामुळे तयार हि-यांच्या किमतीही गेल्या ३ वर्षांत सरासरी ३५ ते ४० टक्क्यांनी घसरल्या आहेत, तर दुसरीकडे रफ हि-यांच्या किमतीही २५% ने घसरल्या आहेत. त्यामुळे कट आणि पॉलिश करणा-या कंपन्यांना १० % नुकसान होत आहे. नैसर्गिक हि-यांना मागणी होती, पण त्या तुलनेत लॅबग्रोन स्वस्त होते. त्यामुळे लोक लॅबग्रोनकडे वळले. अशा प्रकारे लॅबग्रोनने नॅचरल डायमंडचा हिस्सा हिसकावला आहे.
मागणी पुन्हा वाढेल?
भारतातील एकूण हि-यापैकी ३० ते ४०% हि-यांची अमेरिकेत निर्यात होते. सध्या मंदीमुळे अमेरिकन लॅबग्रोन हिरे विकत घेत आहेत. मात्र अमेरिकन बाजार सुधारल्यानंतर नैसर्गिक हि-यांची मागणी पुन्हा वाढेल, असा हिरे व्यापा-यांचा अंदाज आहे.
जी-७ देशांची हि-यांवर बंदी
जी-७ ने रशियातील रफ कट आणि पॉलिश हिरे खरेदीवर बंदी घातली आहे. भारतात ४०% हि-याची आयात रशियातून होते. जी-७ देश खरेदीच्या वेळी रफ इम्पोर्ट सर्टिफिकेट मागतात. युरोपात मंदीमुळे हिरे आणि हि-यांच्या दागिन्यांची मागणी घटली आहे. दोन वर्षांपासून मंदीचे हेच कारण आहे.
कोकणात इंडस्ट्री आल्या, MIDC आल्या तर वेगळे रोजगार मिळू शकतात मात्र इथले नेते फक्त समाजमंदिर गावकीला देणग्या देण्यात धन्यता मानतात.
यात जनतेचेही चूक आहे, डोळे झाकून मतदान करतात... देणग्या घेऊन मतदान करतात म्हणून आमदार-खासदार बिनधास्त निवडून येतात. देणग्या घेतल्यामुळे कुणा मतदाराची विचारण्याची हिम्मत होत नाही. त्यामुळे कोकणच्या अ-विकासाला जबादार कोकणी मतदारच आहेत.
Comments
Post a Comment