# मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय "वचनपूर्ती सोहळा" मोर्बा, ता.माणगांव जि.रायगड येथे संपन्न झाला. # २ कोटी ३० लाख भगिनींना लाभ हस्तांतरित झाला आहे. महिलांना स्वावलंबी व सुरक्षित जीवन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रात १०००० पिंक ई-रिक्षा सुरू
# मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय "वचनपूर्ती सोहळा" मोर्बा, ता.माणगांव जि.रायगड येथे संपन्न झाला.
# २ कोटी ३० लाख भगिनींना लाभ हस्तांतरित झाला आहे. महिलांना स्वावलंबी व सुरक्षित जीवन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रात १०००० पिंक ई-रिक्षा सुरू
# सोहळा महिला सशक्तीकरणाचा..
सोहळा सरकारच्या वचनपूर्तीचा !!
माणगाव / प्रतिनिधी
मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय "वचनपूर्ती सोहळा" मोर्बा (ता.माणगांव जि.रायगड) येथे संपन्न झाला.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील २ कोटी ४४ लाख बहिणींची नोंदणी झाली असून, २ कोटी ३० लाख भगिनींना लाभ हस्तांतरित झाला आहे. महिलांना स्वावलंबी व सुरक्षित जीवन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रात १०००० पिंक ई-रिक्षा सुरू करण्यात येत आहेत. कुटुंबात व समाजात स्त्रियांना समान दर्जा मिळवून देण्यासाठी बालकांच्या नावात आईचे नाव बंधन करण्याचा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. नेतृत्वाच्या मार्गदर्शनाने व माता भगिनींच्या सहभागाने महाराष्ट्रात महिला सक्षमीकरणाची क्रांती घडत असून यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे हातभार लावणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले.
यावेळी राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. उदय सामंत, रायगडचे खासदार तथा अध्यक्ष,स्थायी समिती,पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस मंत्रालय भारत सरकार श्री. सुनिल तटकरे साहेब, राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष श्री. भरत गोगावले, आ.श्री. अनिकेतभाई तटकरे, महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, कोकण विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख, महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त डॉ. कैलास पगारे, रायगड जिल्हाधिकारी श्री. किशन जावळे, पोलिस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्यासह रायगड जिल्ह्यातील तमाम माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Comments
Post a Comment