नैना प्रकल्पाच्या दोन फेज चे उद्घाटनाचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचा पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या प्रशासनाला गाळावा लागला दिवसभर घाम अखेरीस उद्घाटनाचे घोडं गंगेत न्हालं पनवेल/ प्रतिनिधी

 


नैना प्रकल्पाच्या दोन फेज चे उद्घाटनाचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचा पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या 


प्रशासनाला गाळावा लागला दिवसभर घाम 


अखेरीस उद्घाटनाचे घोडं गंगेत न्हालं


पनवेल/ प्रतिनिधी


        शेतकऱ्यांच्या उरावर नैना प्रकल्प बसविण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारी करता विकासाचे आभासी चित्र निर्माण करण्यात शिंदे फडणवीस यांची महायुती दंग झाली आहे. याच प्रयत्नात नैना (Navi Mumbai airport influence notified area) प्रकल्पातील नगर नियोजन योजना क्रमांक २ ते ७ यांमधील ३० मीटर, ४५ मीटर आणि ६० मीटर अशा वेगवेगळ्या रुंदीचे १७.५९ किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी (५ ऑक्टोबर) होणार होते. परंतु ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीवरती हा प्रकल्प उभा राहणार आहे त्यांचा विरोध आणि त्यांनी घेतलेल्या हजारो हरकती यांच्यावर कुठलीही भूमिका न घेता केवळ उद्घाटनाचा घाट घालणाऱ्या प्रशासनाला महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले.

      याबाबत सविस्तर हकीकत अशी आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन फेजचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने करणार होते. परंतु नैना प्रकल्प बाधित शेतकरी त्या विरोधात आंदोलन करू नयेत म्हणून पोलीस प्रशासनाने नैना प्रकल्पग्रस्त बाधित शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष वामन शेळके व पदाधिकारी अनिल ढवळे यांना अटक केली. प्रकल्पग्रस्त बांधवांच्या उरावरती हा प्रकल्प लादला जात असल्याची जाणीव प्रशासनाला देखील होती त्यामुळेच पंतप्रधानांच्या कार्यक्रमात "मिठाचा खडा नको" या उद्देशाने प्रशासनन कामाला लागले. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या धुडकावून प्रकल्प पूर्ण करणारा असाल तर त्याला शेवटपर्यंत विरोध करू अशी भूमिका घेत महाविकास आघाडीच्या वतीने माजी आमदार बाळाराम पाटील हे या अटके संदर्भात जाब विचारण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले. त्यावेळेस स्थानिक पोलिसांनी, अटक केलेल्यांना सोडण्यास हतबलता दर्शविली किंबहुना आता हे आमच्या हातात नसून वरून आदेश आले असल्याचे पोलीस म्हणत असल्याचे खात्रीशीर सूत्रांनी कळविले.

        माजी आमदार बाळाराम पाटील यांनी तुम्ही जर अटक केलेल्यांना सोडत नसाल तर आम्ही देखील इथे ठिय्या देऊन बसतो अशी भूमिका घेतली. अवघ्या काही मिनिटातच महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते पनवेल शहर पोलीस स्थानकाच्या आवारात जमले. प्रशासनाचा निषेध करण्यासाठी हाताला काळ्याफिती बांधून ठिय्या आंदोलन करणारे तमाम कार्यकर्ते नैना हटाव ! शेतकरी बचाव!!, जमीन आमच्या हक्काची,नाही कुणाच्या बापाची! अशा घोषणा देत होते.

          पोलीस प्रशासन देखील आंदोलनकरते इथून उठून आणखीन कुठे जाऊ नयेत यासाठी खबरदारी घेत होते. अखेरीस पंतप्रधानांनी उद्घाटनाचे सोपस्कार पार पाडल्यानंतर अटक झालेल्या दोन पदाधिकाऱ्यांची सुटका झाली,त्यानंतर ठिय्या आंदोलनाची सांगता करण्यात आली. 

      माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या समवेत यावेळी ठिय्या आंदोलनामध्ये शेकाप नेते तथा सुप्रसिद्ध उद्योजक जे एम म्हात्रे, शेकापचे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील, पनवेल शहर जिल्हा चिटणीस गणेश कडू, काँग्रेसचे पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष सुदाम गोकुळशेठ पाटील, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण शेठ घरत, शेकापचे पनवेल तालुका चिटणीस राजेश केणी, युवक काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष हेमराज म्हात्रे, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवेंद्र पाटील उर्फ देवा, माजी नगरसेविका डॉक्टर सुरेखा मोहोकर, सरस्वती काथारा यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.


चौकट:

नैना प्रकल्पा विरोधात १३ हजार हरकती नोंदविण्यात आलेल्या आहेत. प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि भूधारकांचा पराकोटीचा विरोध होत असताना देखील शासन शेतकऱ्यांच्या उरावरती हा प्रकल्प बसवणार असेल तर आम्ही आमच्या अखेरच्या श्वासापर्यंत हा प्रकल्प रद्द करण्यासाठी लढा देत राहणार

~ माजी आमदार बाळाराम पाटील.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर