रायगड नंदिनी उपर,तन्मय पाटील आणि गणेश तोटे राज्य बेंचप्रेस स्पर्धेत विजेते

 



रायगड नंदिनी उपर,तन्मय पाटील आणि गणेश तोटे राज्य बेंचप्रेस स्पर्धेत विजेते

मुंबई : वडाळा येथे दिनांक 28 ते 29 सप्टेंबर 2024 या कालावधीत राज्यस्तरीय बँक प्रेस क्लासिक स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत सब ज्युनिअर मुलींच्या स्पर्धेत नंदिनी ऊपर बॉडी लाईन जिम खोपोली ही सब जुनियर क्लासिक स्ट्रॉंग वुमन या किताबाची मानकरी झाली. जूनियर क्लासिक स्ट्रॉंग मॅन हा किताब संसारे जिम यांचा तन्मय पाटील झाला तर सीनियर इक्विप गट स्पर्धेत 105 किलो वजनी गटाच्या गणेश तोटे फिटनेस आणि पनवेल विजेता झाला याच पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रायगडला दोन सांघिक विजेतेपद पुरुष ज्युनिअर आणि महिला ज्युनिअर प्राप्त झाली तसेच क्लासिक स्पर्धेत सीनियर आणि मास्टर पुरुषांचे उपविजेतेपद मिळाले आहे याबद्दल पावर लिफ्टिंग अध्यक्ष गिरीश वेधक यांनी पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे आनंद व्यक्त केला. आणि खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन केले. या स्पर्धेत रायगड पावर लिफ्टिंग चे संघ प्रशिक्षक म्हणून अरुण पाटकर यांची आणि संघ व्यवस्थापक म्हणून सुभाष टेंबे यांची निवड झाली होती. सहाय्यक म्हणून संदीप कृष्णा पाटकर यांना जबाबदारी दिली होती. या स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी करून 11 सुवर्ण 10 रौप्य आणि 07कांस्यपदके असे एकूण 28 पदके प्राप्त केली आहेत. या स्पर्धेतून निवडक खेळाडू हे राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात सहभागी होतील. खेळाडूंनी मिळवलेल्या या यशाबाबत त्यांचे प्रशिक्षक मार्गदर्शक यांचा सुद्धा महत्त्वाचा वाटा आहे असे मत संघटनेचे सहसचिव सचिन भालेराव,

कार्याध्यक्ष यशवंत मोकल, खजिनदार राहुल गजरमल यांनी व्यक्त केले आहे. तसेच खेळाडूंची मेहनत खूप कामी आली असे ज्येष्ठ खेळाडू माधव पंडित यांनी नमूद केले आहे.

 # स्पर्धेतील पदक विजेते महिला खेळाडू सुवर्णपदक*-क्लासिक स्पर्धा-नंदिनी ऊपर 47 47 किलो गट, अरे शिंदे 52 किलो गट इफेक्ट स्पर्धा गायत्री बडेकर 43 किलो गट. 

# रौप्य पदक विजेती -दिव्या महाडिक 43 किलो गट 

# कांस्यपदक विजेते-लावण्या भगत 69 किलो गट, गार्गी मसूरकर 52 किलो गट, मयूर अनगत 63 किलो गट.

# इक्विप व क्लासिक स्पर्धा स्पर्धा पुरुष गट*

# सुवर्ण*-जाहिद कणेकर, हर्षल देशमुख, गणेश तोटे. (सर्व इक्विक गट) 

क्लासिक स्पर्धा-साहिल पोरवाल तन्मय पाटील ओमकार जाधव बबन झोरे ,नितीन शेजवळ दिनेश पवार

# रौप्य पदक*-(इक्वीप स्पर्धा )

हनुमंत खरात, रितिक पोळ,

क्लासिक स्पर्धा-दर्श पाटील संस्कार सरदार गणेश तोटे रितिक पोळ सचिन देशमुख, रमेश खरे.

# कांस्यपदक विजेते* पुरुष खेळाडू.-(क्लासिक स्पर्धा)--हर्षद देशमुख, विनय पाटील, आसिफ सय्यद,  नागनाथ घरत.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर