पुण्यातील दारुड्या पर्यटकांचा दक्षिण काशी हरिहरेश्वर येथे हैदोस ! # रूमच्या भाड्यावरून झाला वाद, वादात महिलेला गाडीखाली चिरडून दारुडे पर्यटक फरार.
पुण्यातील दारुड्या पर्यटकांचा दक्षिण काशी हरिहरेश्वर येथे हैदोस !
रूमच्या भाड्यावरून झाला वाद, वादात महिलेला गाडीखाली चिरडून दारुडे पर्यटक फरार.
श्रीवर्धन (राजू रिकामे ) :
दक्षिण काशी तीर्थक्षेत्र म्हणून संबोधल्या जाणाऱ्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्या मधील हरिहरेश्वर हया पर्यटन स्थळी आलेल्या पुण्यातील दारुड्या पर्यटकांकडून हॉटेलच्या रूमच्या भाड्यावरून झालेल्या वादात हॉटेल मालकाला मारहाण करण्याच्या प्रयत्नात त्याला वाचवणाऱ्या बहिणीला दारुड्या पर्यटकांनी गाडीखाली चिडून मारण्याचा धक्कादायक प्रकार काल मध्यरात्री दोनच्या सुमारास हरिहरेश्वर येथे घडला असून दारुडे पर्यटक गुन्हा करून पळून जाण्यात यशस्वी झाले असले तरी त्यातील एक जण ग्रामस्थांच्या हाती लागल्याने दारुड्या पर्यटकांना शोधण्यासाठी रायगड पोलिसांचे पथक सज्ज झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रायगड जिल्ह्यातील दक्षिण काशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या हरिहरेश्वर येथे २० ऑक्टोंबर २०२४ रोजी मध्यरात्री १.३० ते २.०० च्या सुमारास पुणे शहरा जवळील पिंपरी चिंचवड भागातून स्कार्पिओ गाडीने आलेल्या मध्य धुंद अवस्थेतील पर्यटकांनी हरिहरेश्वर मधील ममता होमस्टे येथील हॉटेल मधील हॉटेल मालक अभी धामणस्कर यांच्याकडे रूमची मागणी केली त्यांनी रूम दाखवतात रूमचे भाडे कमी करण्यावरून दारुडे पर्यटक व हॉटेल मालक धामणस्कर यांच्यात वाद झाला या वादाची ठिणगी माराहाणी मध्ये
पुण्यातील पिंपरी चिंचवड भागातून आलेल्या दारुड्या पर्यटकांनी हॉटेल मालक अभी धामणस्कर यांना मध्य धुंद अवस्थेत मारहाण केली त्यांच्यासोबत गाडीमधील इतर दारुड्यांनी देखील मारहाण करीत असताना हॉटेल मालक अभी धामणस्कर यांना वाचवण्यासाठी आलेली त्यांची बहीण ज्योती धामणस्कर वय वर्ष ३४ ही मध्यस्थी करीत असताना तिला देखील मारहाण केली व स्कार्पिओ गाडीमधून पळून जात असताना ज्योती धामणस्कर यांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता तिला स्कार्पिओ गाडीखाली चिरडून ठार मारून हे दारुडे पर्यटक फरार झाले. यातील एका दारुड्या पर्यटकाला पकडण्यात ग्रामस्थांना यश आले असून उर्वरित दारुड्या पर्यटकांचा श्रीवर्धन पोलीस व रायगड जिल्ह्यातील पोलिसांकडून शोध चालू करण्यात आला आहे. रात्री अंधारामुळे गाडीचा नंबर मिळू शकला नाही मात्र एका पकडलेल्या दारुड्या पर्यटकांकडून इतर जणांची नावे व पत्ते मिळवण्यात पोलिसांना यश येत असून उर्वरित फरारी आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
या घटनेबाबत हरिहरेश्वर व दिवेआगार तसेच श्रीवर्धन मधील हॉटेल चालक-मालक व रिसॉर्ट चालक मालकांकडून या घटनेबाबत मोठ्या प्रमाणावर भीती व्यक्त करण्यात येत आहे एकंदरीत पर्यटनाला गालबोट लावण्याचे काम पुण्यातील दारुड्या पर्यटकांकडून झाल्याने व एका महिलेला ठार मारण्याच्या प्रकारामुळे संपूर्ण श्रीवर्धन तालुक्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment