# दहिसर मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेने घोसाळकर कुटुंबियातील सदस्याला उमेदवारी देत भाजपासमोर उभं केलं तगडं आव्हान # दहिसर मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेने तेजस्वी घोसाळकर यांना उमेदवारी निश्चित

 


# दहिसर मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेने घोसाळकर कुटुंबियातील सदस्याला उमेदवारी देत भाजपासमोर उभं केलं तगडं आव्हान 

# दहिसर मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेने तेजस्वी घोसाळकर यांना उमेदवारी निश्चित

मुंबई / जितेंद्र नटे

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांची घोषणा केली जात आहे. दहिसर मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेने घोसाळकर कुटुंबियातील सदस्याला उमेदवारी देत भाजपासमोर तगडं आव्हान उभं केलं आहे. दहिसर मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेने तेजस्वी घोसाळकर यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तेजस्वी घोसाळकर यांनी आज मातोश्रीवर जात एबी फॉर्म घेतला. यावेळी तेजस्वी यांचे सासरे आणि माजी आमदार विनोद घोसाळकरही होते. मातोश्रीवरुन तेजस्वी घोसाळकर यांनी ग्रीन सिग्नल देण्यात आलं आहे. 


तेजस्वी घोसाळकर यांच्या उमेदवारीमुळे दहिसरमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दहिसरमध्ये भाजपाच्या मनिषा चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तेजस्वी घोसाळकर या माजी नगरसेविका असून त्यांचे पती अभिषेक घोसाळकर यांची 8 फेब्रूवारी 2024 ला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.


अभिषेक घोसाळकर हे ठाकरे यांचे समर्थक होते. ते शिवसेनेचे माजी नगरसेवकही राहिलेले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात घोसाळकर कुटुंबियांचा चांगला जनसंपर्क आहे. लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर मतदारसंघातून तेजस्वी घोसाळकर यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा होती. पण हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आल्याने भूषण पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. भूषण पाटील यांचा पराभव झाला होता. तेजस्वी घोसाळकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत इथून निवडणूक लढवावी असा पर्यायही ठेवण्यात आला होता. पण हा पर्याय तेजस्वी घोसाळकर यांनी नाकारला होता. 


आता विधानसभा निवडणुकीत दहिसर विधानसभा मतदारसंघातून तेजस्वी घोसाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उत्तर मुंबई हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे या मतदार संघात तेजस्वी घोसाळकर कशी लढत देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


शिवसेना (UBT) पक्षाच्या मुंबईतील जागा - 

1. भायखळा 

2. शिवडी 

3. वरळी 

4. वडाळा 

5. दादर माहीम 

6. मागाठाणे 

7. विक्रोळी 

8. भांडुप पश्चिम 

9. जोगेश्वरी पूर्व 

10. दिंडोशी 

11. अंधेरी पूर्व 

12. चेंबूर 

13. कुर्ला

14. वांद्रे पूर्व 

15. कलिना 

16. गोरेगाव

17. वर्सोवा 

18. घाटकोपर पश्चिम 

19. विलेपार्ले

20.दहिसर

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर