राष्ट्रवादी कडून संतोष घरत उरणमध्ये इच्छुक उमेदवार# उरण विधानसभा मतदारसंघात आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता
- Get link
- X
- Other Apps
उरण विधानसभा मतदारसंघात आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता
उरण /विठ्ठल ममताबादे
विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आता प्रचाराला तिकिटासाठी धावपळ करायला वेग येणार उरण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाचा मुद्दा चर्चेत आलय महाविकास आघाडी आणि महायुतीत जागा वाटपाबाबत काय चाललंय कोणत्या जागांवर रस्सीखेच सुरू आहे याबाबत उरण विधानसभा मतदार संघात जोरदार चर्चा सुरु झालेली आहे या चालू असलेल्या चर्चे मध्ये पूर्ण विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची बिघाडी होण्याची चिन्ह दिसत आहेत. जो तो आमच्याच पक्षाचा उमेदवार उमेदवारी करणार असल्याची शंभर टक्के खात्री देत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची उमेदवारी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी जाहिराच केली असून त्यांनी गाव,बूथनिहाय बैठाका सुरुही केल्या आहेत.त्यातच महाविकास आघाडीचे शेतकरी कामगार पक्षातून प्रीतम म्हात्रे यांनी तर पायाला भिंगरी लावून नवरात्री उत्सवात उरण विधानसभा पिंजून काढला. मोठमोठे बॅनर तर जयंत पाटील शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस ज्येष्ठ नेते यांनी तर प्रीतम म्हात्रे उमेदवार असतील असे सांगून टाकले असताना नुकताच विधानसभा निवडणुकी बाबत शरदचंद्र पवार यांची भेट घेऊन चर्चा केली सोबत मा. आमदार बाळाराम पाटील सोबत होते.
महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातून संतोष घरत हे इच्छुक असल्याचे पत्र पक्षातील वरिष्ठांकडे दिले आहे.संतोष घरत हे कामगार नेते असून त्यांचाही जनतेशी दांडगा जनसंपर्क आहे. अनेकांना त्यांनी न्याय मिळवून दिला आहे. बहुजन चळवळीत ते सक्रिय आहेत त्यामुळे त्यांचेही पारडे जड दिसते.तर महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत उभे राहणार असल्या ची नागरिकांमध्ये चर्चा सुरु आहे,
त्यांच्याशी संपर्क केला असता मी निवडणूक लढणार नसल्याचे बोलले जाते मात्र त्यांच्या नक्की मनात काय हा प्रश्न मात्र गुलदस्त्यात आहे.
अशी उरण विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीची उमेदवारीची रस्सीखेच सुरु आहे. तसेच महायुतीमध्ये निवडणुकीसाठी उरण विधानसभेसाठी अपक्ष आमदार महेश बालदी यावेळी भाजप पक्षातून महायुतीचे शिवसेना शिंदे गड राष्ट्रवादी अजित पवार गड आरपीआय आठवले गट व भाजप यांचा एकमेव उमेदवार असल्याचे दिसत आहे. तर एकला चलो रे म्हणत मनसे विधानसभेत उडी मारणार असून याचा फटका बसणार का ? बसला तर कोणाला बसेल हे मात्र पहावं लागेल.या पूर्ण विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारीच्या जागा वाटपात कोण बाजी मारेल हे येणाऱ्या काळात समजेल हे सर्व पाहताना आघाडीत बिघाडी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment