चॅम्पियन्स कराटे क्लब आयोजित निमंत्रितांची राज्यस्तरीय कराटे स्पर्धा संपन्न... म्हसळा प्रतिनिधी: संतोष उध्दरकर.

 


चॅम्पियन्स कराटे क्लब आयोजित निमंत्रितांची राज्यस्तरीय कराटे स्पर्धा संपन्न...

म्हसळा प्रतिनिधी: संतोष उध्दरकर.

म्हसळा:श्रीवर्धन येथे कुलकर्णी सभागृह येथे चॅम्पियन्स कराटे क्लब रायगड तर्फे राज्यस्तरीय कराटे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत रायगड ,पुणे,ठाणे,मुंबई,सातारा,सांगली कोल्हापूर या जिल्ह्यातील साधरण २०० स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला.चॅम्पियन्स कराटे क्लब चे संस्थापक गुरू संतोष मोहिते यांच्या मार्गदर्शन खाली होणाऱ्या  

स्पर्धेसाठी डॉ.मधुकर ढवळे सर,नॅशनल हॉली बॉल प्लेअर अजित मापुस्कर तसेच ऍड. संतोष साप्ते यांची प्रमुख उपस्थिती लाभली.उपस्थित प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते संस्थेच्या साऊथ एशियन गोल्ड मेडलिष्ट कुमार प्रसाद अवघडे यांचा सत्कार देखील करण्यात आला.

संपूर्ण स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या गटा मधील अव्वल ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, रायगड जिल्ह्यामधुन खेळणाऱ्या कुमार विक्रांत खांडेकर,विहान विचारे, रूजुला यवतकर,मृदूनी जोशी यांना आकर्षक चषक व रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सिनियर गटामधुन कुमार शंतनु जाधव, साक्षी तांदळेकर हे खेळाडू अव्वल ठरले.

स्पर्धेचे प्रथम पारितोषिक टीम महाड ,द्वितीय पारितोषिक टीम श्रीवर्धन,म्हसळा आणि तृतीय पारितोषिक टीम मुंबई या संघाने पटकाविला. या स्पर्धेसाठी

प्रशिक्षण म्हणुन अविनाश मोरे,रितेश मुरकर आणि प्रसाद विचारे यांच्या नियोजनखाली स्पर्धा यशस्वी रित्या पार पडली.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर