रायगड मत - संपादकीय : # भूमिपुत्र प्रितम जनार्दन म्हात्रे उरणमधून आमदार म्हणून जिंकू शकतात... # आतापर्यंत हजारो तरुणांच्या हाताला काम दिले. नोकरीं मिळवून दिली. # सद्याची वाढती महागाई, बेरोजगारी, फसवे आश्वास, वाढती गुन्हेगारी हे सर्व पाहता लोक महायुतीला कंटाळली आहे. # उरण विधानसभा आमदार कोण? वाचा "रायगड मत"" सर्व्हे रिपोर्ट

 


रायगड मत - संपादकीय 

संपादक - जितेंद्र नटे 

raigamat.page


# भूमिपुत्र प्रितम जनार्दन म्हात्रे उरणमधून आमदार म्हणून जिंकू शकतात...


# आतापर्यंत हजारो तरुणांच्या हाताला काम दिले. नोकरीं मिळवून दिली.


# सद्याची वाढती महागाई, बेरोजगारी, फसवे आश्वास, वाढती गुन्हेगारी हे सर्व पाहता लोक महायुतीला कंटाळली आहे.

# उरण विधानसभा आमदार कोण? वाचा "रायगड मत"" सर्व्हे रिपोर्ट 

लोकशाहीत काहिही घडू शकतं. नरेंद्र माेदी तिस-यांदा पंतप्रधान झाले मात्र त्यांना घाम फुटला. महाराष्ट्राने त्यांना राेखलं आहे. जेव्हा अंहकार हाेताे तेव्हा जनता आपली जागा दाखवत असते. याच धर्तीवर महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूने काैल देत महायुतीच्या नेत्यांना घाम फाेडला आहे. उमेद्वार हा ताकदवार असला पाहिजे. अगदी सगळ्याच बाजूने. नुसतं काम असून नाही तर पैसा फेकणारा व्यक्तीिशवाय आज जिंकणेच कठीण झाले आहे. आजच्या मितीला पहाता श्रीरंग बारणे हे मावळ मतदार संघातून जिंकले खरे मात्र त्यांना ब-याच ठिकाणाहून कमी मतदान झालेले दिसत आहे. उरणमध्ये तर महािवकास आघाडीला जनतेने डाेक्यावर घेतले आहे. लोकसभा इलेक्शनला शेकाप, शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) हे एकत्र आल्यामुळे बराच फरक पडला. बारणे हे दाेन वेळा खासदार हाेते. तरी त्यांना घाम फुटला हाेता. तसेच पनवेल मतदार संघामधून आमदार प्रशांत ठाकूर, रामशेठ ठाकूर यांची जबरदस्त मदत मिळाली नसती तर त्यांचा पराजय निश्चित झाला असता. रामशेठ ठाकूर यांनी पनवेलचा गड आपल्या वैयक्तीक ताकदीने पुरेपर वापर करून बरेच वर्षे बांधून ठेवला आहे.


मात्र उरण मतदार संघाचा विचार केला तर येथे महेश बालदी हे भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार आहेत. मात्र जनतेने त्यांना नाकारले आहे. आमदारकीच्या निवडणुकीला काही दिवस राहिले आहेत. उरणमध्ये स्थानिक भूमिपुत्र हवाय अशी कुजबुज सद्या जोऱ्यात सुरु आहे. तसेच नव्या दमाचा, ताकदवार आणि सर्वच स्थरावर झाेकून देणारा असा उमेद्वार असवा अशी उरणकरांची मनधरणी आहे. प्रितम जनार्दन म्हात्रे हे जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून अनेक वर्षे समाजसेववेत आहेत. तसेच रोजगार मेळावे घेऊन त्यांनी हजारो तरुणांना आतापर्यंत जॉब मिळवून दिला आहे. स्थानिक असल्यामुळे आपल्या लोकांबद्दल त्यांना आपुलकी व प्रेम आहे. सद्या त्यांनी मतदार संघातील गावेच्या गावे पिंजून काढली आहेत. अनेकांच्या डोळ्यातील अश्रू त्यांनी पहिले आहेत. आपल्याला या लोकांच्या डोळ्यातील अश्रू फुसायचे आहेत. त्यांच्या मुलाबाळांना रोजगार नोकऱ्या मिळवून द्यायाचे पुण्याचे काम करायचे आहे. इथे दि. बा. पाटील आंतराष्ट्रीय विमानतळ आले आहे. यामध्ये नोकऱ्या आणि छोटे छोटे व्यवसाय आपल्या स्थानिकांना प्रथम मिळाले पाहिजेत यासाठी ते स्किल डेव्हहलपमेंट कार्यक्रम राबवून अनेक महिने तरुणांना प्रशिक्षण देत आहेत. याच उरणविधानसभा मतदार संघातील लोक प्रितम दादाने इलेक्शन लढावे आणि आमदार होऊन समाजसेवा करावी, स्थानिकांच्या पाठीशी उभे राहावे, असे म्हणू लागले आहेत. 


मागील निवडणुकीत मनाेहर शेठ भाेईर शिवसेना), विवेक पाटील (शेकाप) तर महेश बालदी (अपक्ष) असे उभे राहिले. मतांचे विभाजन झाले आणि महेश बालदी हे विजयी झाले. मात्र आता तशी परिस्थीती नाही. जर महािवकास आघाडी एकत्र प्लानिंग करुन लढले तर महाराष्ट्रात बरेच आमदार जिंकूण येतील. यातच उरणमध्ये प्रितम जनार्दन म्हात्रे हे नाव पुढे आले आहे. अनेक लाेकांची इच्छा आहे की, ते आमदार व्हावेत. आमदारीकीला साजेल असे त्यांचे, कर्तृत्व, वक्तृत्व आणि नेतृत्वही आहे. ही झाली नाण्याची एक बाजू. तर दुसरी बाजू आहे ती आर्थिक ताकद, आणि यामध्येही प्रितम म्हात्रे कुठे कमी पडणार नाहीत. शिवसेनाला भावनिक ताकद मिळाली पण उमेद्वार तर आर्थिक सक्षम आणि जनतेपर्यंत पाेहचणारा नसेल तर सर्व काही असून ताे पराजित हाेऊ शकता. त्याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे अनंत गिते. अनंत गिते हे अनेक वेळा भावनिक राजकारण करुन जिंकले. मात्र आता ते दिवस राहिले नाहीत. बुथपर्यंत माणसे, मतदार पाेहचवता यायला पाहिजेत. 


या सर्व गाेष्टींचा अभ्यास केला तर उरण मतदार संघामध्ये महाविकास आघाडीचा सक्षम तरुण तडफदार, चरित्रवाण, सगळ्यांशी चांगले संबंध असणारा आणि खर्च करणारा असा उमेद्वार दिल्यास ताे उमेद्वार जिंकू शकताे. या सर्व गगोष्टींचा विचार केला तर स्थानिक भूमिपुत्र प्रितम जनार्दन म्हात्रे हे नाव आता जवळ जवळ निश्चित झाले आहे. तसे झाल्यास उरणकरांना आपल्या हक्काचा माणूस मिळाल्याशिवाय राहणार नाही. उरण जिंकायचे असेल तर महािवकास आघाडीकडे सद्यातरी दुसरा पर्याय नाही आणि तशी संधी मिळाल्यास प्रितम दादा या संधीचे सोने केल्याशिवाय आणि भूमिपुत्रांसाठी अहोरात्र राबराब राबल्याशिवाय राहणार नाहीत. प्रितम जनार्दन म्हात्रे एक लाखाच्या वर मतदान मिळवून भरगोस मतांनी निवडून येतील यात शंकाच नाही. 


♦️ मुंबई ♦️ नवी मुंबई♦️ व ♦️ रायगड ♦️जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी Raigad Mat Live YouTube Channel ला Subscribe करून बाजूच्या 🔔बेल आयकॉन वर क्लिक करा व Share करा.


🔴 रायगड मत Live 📢 बातम्या🎙️ मुलाखत आणि 🎊 जाहिरातींसाठी संपर्क साधा 🙏

✍️ संपादक : जितेंद्र जी. नटे 

📱 संपर्क : 8652654519

 📧 raigadmat@gmail.com 

🪩 raigadmat.page 


https://youtu.be/vR9NICgmEZQ?si=SeMc7g6AFFsEOkuv


https://www.instagram.com/stories/raigadmat/3478538800164372070?utm_source=ig_story_item_share&igsh=OHljcHN1emo4dnJ2



Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर