वसुबारसच्या पूजेपासून खऱ्या अर्थाने दिवाळीच्या सणाला सुरुवात होते.वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी.

 




वसुबारसच्या पूजेपासून खऱ्या अर्थाने दिवाळीच्या सणाला सुरुवात होते.वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी. 


विशेष लेख@रायगड मत 

आज सोमवारी २८ ऑक्टोबर रोजी, दिवाळीची वसुबारसने सुरवात होत आहे. आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथीला वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी साजरी करण्यात येते. वसुबारसनिमित्त आपल्या प्रियजणांना हटके शुभेच्छा पाठवून दिवाळीचा आनंद द्विगुणीत करा.


दिवाळीचा पहिला दिवस हा वसुबारसपासून सुरु होतो. आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथीला वसुबारस साजरी करण्यात येते. पंचांगानुसार द्वादशीची तिथी २८ ऑक्टोबर २०२४ सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांपासून ते २९ ऑक्टोबर संध्याकाळी ५ वाजून ४ मिनिटांपर्यंत असणार आहे. उदया तिथीनुसार २८ आक्टोबर रोजी, सोमवारी वसुबारस साजरी होईल. दिवाळीची पहिली पणती सोमवारी २८ ऑक्टोबरला गाय वासरांसाठी लावली जाणार आहे. 


वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी. वसुबारसच्या पूजेपासून खऱ्या अर्थाने दिवाळीच्या सणाला सुरुवात होते. वसुबारस हा सण समुद्रमंथन या पौराणिक प्रसंगाशी संबंधित आहे. असं म्हणतात, समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. कामधेनू हे मातृत्व, प्रजनन, देवत्व आणि पालनपोषण यांच्या आशीर्वादांशी तसेच, भगवान श्रीकृष्ण, विष्णू अवताराशीही त्याचा संबंध जोडला आहे. वसुबारसनिमित्त आपल्या प्रियजणांना हटके शुभेच्छा पाठवून दिवाळीचा आनंद द्विगुणीत करा.


वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा

दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी


गाई म्हशी कोणाच्या, लक्ष्मणाच्या

लक्ष्मण कोणाचा? आई बापाचा,

दे माय खोबऱ्याची वाटी,

वाघाच्या पाठीत घालीन काठी..

वसुबारसनिमित्त हार्दिक शुभेच्छा



आज वसुबारस

दिवाळीचा पहिला दिवस

ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना

सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो.

वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा



स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची

वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची

दिवाळीचा पहिला दिवस

वसुबारसनिमित्त मंगलमय शुभेच्छा...

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर