हरीहरेश्वर हिट अँन्ड रन प्रकरणातील आठ फरार आरोपी अद्यापही पोलिसांना सापडता सापडत नाहीत .. घटनेचा पर्यटन व्यावसायिकांनी घेतला धसका

 




हरीहरेश्वर हिट अँन्ड रन प्रकरणातील आठ फरार आरोपी अद्यापही पोलिसांना सापडता सापडत नाहीत .. घटनेचा पर्यटन व्यावसायिकांनी घेतला धसका.


श्रीवर्धन / मंगेश निंबरे

 हरीहरेश्वर येथिल ममता स्टे होम येथे २० आक्टों २०२४ च्या मध्य रात्री दिड वाजताच्या सुमारास पुणे येथून आलेले मदधुंद पर्यटकांनी वाद करून निष्पाप महिला ज्योती धामणस्कर यांना गाडी खाली चिरडून जिवे मारले मात्र त्या घटनेतील तिन आरोपी श्रीवर्धन पोलिसांच्या ताब्यात आहेत मात्र आठ आरोपीं अद्याप ही पोलिसांना सापडलेले नाहीत तर आरोपीकडे असलेली स्कार्पिओ गाडी पोलिसांना पुण्यात सापडली असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे मात्र अन्य आठ आरोपींचा सुगावा पोलिसांना अजून लागलेला नाही .

    घडलेल्या घक्कादायक घटनेमुळे पर्यटन व्यवसायावर परिणाम होत असून स्थानिक व्यवसाईकां मध्ये संभ्रप निर्माण होऊन भीतीचे वातावाण निर्माण झाले आहे .हरीहरेश्वर दक्षिण काशी ओळख असलेल्या ठिकाणी संरक्षण म्हणून पोलिस चौकी बंद असून ती चालू करण्याची मागणी नागरीक करीत आहेत . श्रीवर्धन दिवेआगर हरीहरेश्वर हि पर्यटन स्थळ असून पर्यटन व्यावसायिकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे . तर अनेक जनांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत .

     हरीदेश्वर येथिल धक्का दायक घटने नंतर स्थानिकांच्या मनात भिती असून हरीहरेश्वर येथे असलेली पोलिस चौकी अनेक दिवस बंद आहे . पोलिस चौकी त्वरीत सुरु कारादी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत . गेले एक ते दिड वर्षा पासून पोलिस चौकी बंद असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे . येथे होणाऱ्या गुन्ह्या मुळे व घटनामुळे याठीकाणी पोलिस सुरक्षा कायम स्वरूपी असणे अवश्यक आहे . मंदिरामधे होणाऱ्या सभांमधे स्थानिकां कडून पोलिस चौकी पुन्हा सुरु करावी अशी मागणी स्थानिकांच्या वतीने अनेक वेळा करण्यात आलेली आहे मात्र अद्याप पोलिस्स चौकी चालून नसलाने तक्रारी निर्माण होत असतात . तसेच रात्रीच्या वेळेस पोलिसांन नाक्या नाक्यांवर गस्त घालले अवशक आहे . जेणे करून मद्यपीना व इतर तक्रारी ना आळा बसेल .

    दरम्यान येणारे पर्यटक हे टोळक्या टोळक्यांनी पर्यटनाला येत असतात . यावेळी पर्यटक सांगताना आमचे नातेवाईक मोठ्या हुद्यावर कामावर आहेत असे सांगत पर्यटन व्यवसायीकांशी हुज्जत घालत तुमचा परवाना रद्द करू तुमची तक्रार करू अशी दादागिरी करून धमक्या देतात . तर वहानांवर पोलिस अधिकारी , भारत सरकार. महाराष्ट्र शासन , नावाच्या फलक पट्या लावून तसेच आम्ही अधिकारी आहोत अशी बतावणी करून पर्यटन व्यवसायिकांना टोपी लावतात अशा अनेक तक्रारीं मुळे पोलिस चौकी असणे आवश्यक आहे अन्यथा पर्यटनाची सुरक्षा वाऱ्यावर आहे . 


    - हरीहरेश्वर येथिल घटनेतील फरार आरोपी बाबत उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीवर्धन - गर्जे मॅडम यांच्या कडे भ्रमण ध्वनी वरून संपर्क केला असता - त्या म्हणाल्या आरोपींचा तपास सुरू आहे पुणे येथे तपास पथके तपास करीत आहेत असे सांगितले .



Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर