बीजेपी आणि इतर पक्षातील कार्यकर्त्यांचा शेकापमध्ये प्रवेश

 




बीजेपी आणि इतर पक्षातील कार्यकर्त्यांचा शेकापमध्ये प्रवेश 

पनवेल: शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेतृत्व प्रीतम म्हात्रे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन बीजेपी आणि इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे प्रीतम म्हात्रे आणि पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष नारायण शेठ घरत, जितेंद्र म्हात्रे, गुरुनाथ गायकर, राम भोईर, जगदीश पवार, रामेश्वर आंग्रे, अनिल घरत यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

      शेकापचे प्रीतम जनार्दन म्हात्रे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक जण बीजेपी आणि इतर पक्षातून शेतकरी कामगार पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश करत आहेत. शेकापमध्ये पक्ष प्रवेशाचा ओघ वाढत चालला आहे. सोनारी गावातील शेकापमध्ये प्रवेश केलेल्या काही जणांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले. मात्र या तरुणांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, ज्यांना नोकरीवरून काढले आहे त्यांना नोकरीला लावण्याचे काम मी करणार असल्याचे प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले. घारापुरी येथील निकेतन घरत आणि रोहन पाटील या भाजपच्या कार्यकर्त्यांनी शेकाप मध्ये प्रवेश केला. प्रदीप तुंगारे, गणेश भोईर, विकास मोरे यांनी देखील शेकापमध्ये जाहीर प्रवेश केला. आमच्यावर विश्वास ठेवून तुम्ही पक्षात प्रवेश केला आहे त्या विश्वासाला तडा जाऊन देणार नसल्याचे प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले. 

 


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर