# शालेय विद्यार्थिनी यांच्या साठी स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे आयोजन # श्री रविप्रभा मित्र संस्था, पंचापत समिती म्हसळा व चॅम्पियन कराटे क्लब यांचा संयुक्त उपक्रम

 



# शालेय विद्यार्थिनी यांच्या साठी स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे आयोजन 

# श्री रविप्रभा मित्र संस्था, पंचापत समिती म्हसळा व चॅम्पियन कराटे क्लब यांचा संयुक्त उपक्रम

म्हसळा प्रतिनिधी / संतोष उध्दरकर

म्हसळा: महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लहान मुलींचे लैगिक शोषण, तरुणी व महिला यांच्या वर होणारे वाढते अत्याचार पाहता श्री रविप्रभा मित्र संस्था यांच्या विषेश प्रयत्नाने व चॅम्पियन कराटे क्लब श्रीवर्धन, म्हसळा यांच्या पुढाकाराने तसेच पंचायत समिती, म्हसळा गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्या सहकार्याने म्हसळा तालुक्यातील प्राथमिक शालेय विद्यार्थीनी यांच्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे आयोजन करून रायगड जिल्हयात तसेच म्हसळा तालुक्यात प्रथमच अशा प्रकारचे प्रशिक्षण उपक्रम घेत असल्याने तालुक्यात संस्थेचे व पंचायत समितीचे तसेच चॅम्पियन कराटे क्लबचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.या उपक्रमाला ७ ऑक्टो ते १७ ऑक्टो असे १० दिवसाच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे सर्वप्रथम मराठी शाळा न.१, पाभरा, खरसई, नेवरुळ ईथे याचे आयोजन करून मुलींना सक्षम बनवुन या सर्व शालेय मुलींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे असे संस्थेचे सचिव संतोष उध्दरकर यांनी सांगितले.

--------------------------------------

सध्या होत असलेले मुली, महिला यांच्यावर शारीरीक व मानसिक अत्याचार पाहता शालेय मुलींना सक्षम व निर्भिड बनविण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता वाटत असल्याने आम्ही या स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे आयोजन करून शालेय मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देऊन त्यांना सक्षम बनविणार.

- रविंद्र लाड

श्री रविप्रभा मित्र संस्था, अध्यक्ष.

----------------------------------------

चॅम्पियन कराटे क्लब, विविध शाळा, महाविद्यालय, महिला पथक ( निर्भया पथक ), सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विविध जिल्यात शास्त्र शुद्ध, तंत्रशुद्ध, वायु युद्ध अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. याच प्रकारचे प्रशिक्षण देऊन मुलींना सक्षम बनवुन क्रांती घडविता येणार आहे.

संतोष मोहिते.

कराटे क्लब सेंन्सई.( प्रेसिडेंट )

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर