रायगड मी मराठी प्रतिष्ठानच्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त नुकतेच गोरेगाव या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले
रायगड मी मराठी प्रतिष्ठानच्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त नुकतेच गोरेगाव या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले
मुंबई / प्रतिनिधी
या समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो या उदात्त हेतूने रायगड मी मराठी प्रतिष्ठान ( रजि.) च्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त दि. O६ ऑक्टोबर २०२४ रोजी, आय. बी. पटेल स्कुल, गोरेगाव (प), या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्सपूर्द सहभाग लाभला. सामाजातील अनेक प्रतिष्ठान, संस्था आणि मंडळ यांनी देखील सहभाग घेऊन रक्तदान केले. तसेच विविध क्षेत्रात काम करणारे समाजसेवक, राजकीय मंडळी आणि मान्यवरांनी उपस्थिती लावून रक्तदान शिबिरात सहभाग घेतला. या शिबिरात १५८ विक्रमी रक्त बॅगची नोंद झाली. प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. आदेश संदेश लाड यांनी या शिबिरात सहकार्य करणाऱ्या बोरिवली ब्लड बँक, मान्यवर, ग्रामस्थ, प्रतिष्ठानचे सर्व सभासद तसेच सामाजिक संस्था यांचे आभार मानले.
रायगड मी मराठी प्रतिष्ठान ही संस्था अनेक समपयोगी काम करत असते. जवळ जवळ हजारोच्यावर स्वयंसेवक या संघटनेत काम करीत असतात. त्याचा गोरगरीब जनतेला होतं असतो.
Comments
Post a Comment