पनवेलमध्ये मोफत वैद्यकीय उपकरण केंद्राचे उद्घाटन**
*पनवेलमध्ये मोफत वैद्यकीय उपकरण केंद्राचे उद्घाटन**
पनवेल: WE क्लब ऑफ न्यू पनवेल स्टील टाऊन आणि अंत्योदय फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने गुरु नानक दरबार गुरुद्वारा, न्यू पनवेल येथे काल मोफत वैद्यकीय उपकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून गरजू लोकांना कोणत्याही भाड्याशिवाय आणि फक्त जमानत रक्कम भरून वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या केंद्रात ३१ उपकरणांचा समावेश असून, त्यात ३ व्हील चेअर्स, ५ कमोड चेअर्स, १० फोल्डेबल वॉकर, १० चार पायांच्या काठ्या आणि ३ फिंगर एक्सरसाईझरचा समावेश आहे.
९ ऑक्टोबर २०२४ रोजी आयोजित उद्घाटन सोहळ्यात WE क्लबच्या प्रमुख सदस्यांनी आणि अंत्योदय फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी श्री मेहता जी आणि श्री बरोडिया जी ह्याने उपस्थिती लावली होती. गुरुद्वारा समितीचे सदस्य श्री हरविंदर सिंग जी, श्री प्रद्युम्न सिंग जी, श्री जगदीश सिंग जी ह्यांचे ही या कार्यक्रमाला मोलाचे योगदान होते. या उपक्रमाच्या माध्यमातून पनवेल परिसरातील कोणत्याही समाजातील गरजू व्यक्तींना मदत मिळणार आहे. या उपक्रमासाठी पनवेल गुरुद्वारा ने त्यांची जागा व सेवा उपलब्ध करून दिली आहे.
कार्यक्रमाला WE क्लबच्या डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट सुधा कामथ, मल्टिपल डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी WE आरती भाटिया, PDP WE आशा गुप्ता, WE चित्रा मेलमाने, WE स्मिता शेनॉय तसेच PDP WE मंजू जैन, डिस्ट्रिक्ट जॉइंट सेक्रेटरी उपजिंदर कौर, क्लब प्रेसिडेंट WE मेघा जैन यांच्यासह इतर प्रमुख सदस्यांनी हजेरी लावली. या नव्या केंद्रामुळे पनवेल आणि आसपासच्या भागातील लोकांना आवश्यक ते वैद्यकीय उपकरणे मिळवण्यास मोठी मदत होणार आहे.
Comments
Post a Comment