बचतगटांच्या आर्थिक उन्नतीसाठी "ग्रामीण शहरी व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र" सुरू - आदिती वरदा सुनील तटकरे
बचतगटांच्या आर्थिक उन्नतीसाठी "ग्रामीण शहरी व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र" सुरू - आदिती वरदा सुनील तटकरे
मुंबई /प्रतिनिधी
महिला आर्थिक विकास महामंडळ अदानी फाउंडेशनच्या मदतीने बचतगटांच्या आर्थिक उन्नतीसाठी "ग्रामीण शहरी व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र" सुरू करत आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी दोन्ही संस्थांमध्ये आज मंत्रालयात करार करण्यात आला.
या प्रकल्पाच्या माध्यमातून महिला बचत गटांना व्यवसायासाठी एक कायमस्वरूपी व्यासपीठ मिळणार आहे. याद्वारे त्यांची आर्थिक उन्नती होण्यासही मोठी मदत होणार आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अहिंसा नगर, मालाड येथे जागाही देण्यात आली असून, महिला सक्षमीकरणाच्या या चळवळीत बहुमोल योगदान दिल्याबद्दल अदानी फाउंडेशन व मुंबई महानगरपालिकेचे मनापासून आभार.
यावेळी महिला आर्थिक विकास मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक माया पाटोळे, अदानी फाउंडेशनचे शनय शाह त्यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment