भाई अनिकेत तटकरे यांच्याहस्ते सकलप येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या फलकाचे अनावरण

 





भाई अनिकेत तटकरे यांच्याहस्ते सकलप येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या फलकाचे अनावरण

म्हसळा / जितेंद्र नटे

म्हसळा - खारगाव खुर्द सकलप येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गाव कमिटी स्थापन करण्यात आली आणि त्या फलकाचे अनावरण मा. आम. श्री अनिकेतभाई तटकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यावेळीं जिल्हा सरचिटणीस महादेव पाटील, तालुका अध्यक्ष समीर बनकर, वरवठणे गण उपाध्यक्ष चंद्रकांत कांबळे, अध्यक्ष विजय लोणशिकर, खजिनदार मनोहर पाटील, वसंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

नुकतेच या गावच्या सकलप कोंड गवळी वाडी आणि खारगावखुर्द सकलप ग्रामस्थांनी पक्षाला जाहीर पाठींबा देऊन कोकणचे भाग्यविधाते सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत पक्ष् प्रवेश केला होता. त्यामुळे संपूर्ण गाव आता राष्ट्रवादीमय झाला आहे. गेली अनेक वर्षे ही गाववाडी विकासापासून वंचित होत्या. मात्र तटकरे साहेब यांनी विशेष निधी देऊन या गावात विकासकामे टाकली आहेत. या होणाऱ्या विकास कामामुळे आम्ही सर्वजण तटकरे साहेब यांना जाहीर पाठिम्बा देत आहोत असे यावेळी सांगण्यात आले. नवीन कमिटी स्थापन करून त्यांना शुभेच्या देण्यात आल्या.

म्हसळा तालुक्यातील गावेच्या गावे पिंजून काढून राष्ट्रवादीचा प्रसार आणि प्रचार जिल्हा सर चिटणीस महादेवराव पाटील आणि तालुकाध्यक्ष समीर बनकर हे करीत आहेत. अनेक लोकांची विकास कामे अनेक वर्षे रखडली आहेत ती समजून घेऊन महादेव पाटील आणि समीर बनकर हे सोडविण्यासाठी त्या गावचे अडी अडचणी सुनिल तटकरे साहेब यांच्यापर्यंत पत्राद्वारे किंवा ग्रामस्थाना स्वतः घेऊन पोचवत आहेत.




Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर