मोहोपाड्यामध्ये भव्य रोजगार मेळाव्याला प्रचंड उस्फुर्त असा प्रतिसाद

 






मोहोपाड्यामध्ये भव्य रोजगार मेळाव्याला प्रचंड उस्फुर्त असा प्रतिसाद

रसायनी / प्रतिनिधी


लायन्स क्लब ऑफ पनवेल व जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था, यांच्या संयुक्त विद्यमाने  रविवार दिनांक १३/१०/२०२४ रोजी  जनता विद्यालय मोहोपाडा ,रसायनी, पनवेल येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम गणपती आणि सरस्वतीला वंदन करून शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून जे एम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रितमदादा म्हात्रे व लायन्स क्लब ऑफ पनवेलचे अध्य्क्ष श्री. एस. जी चव्हाण, डिस्ट्रिक्टचे जीएसटी चेअरपर्सन ला. विजय गणत्रा आणि डिस्ट्रिक्टचे युथ एम्पॉवरमेंटचे ला. नयन कवले , एनआयपीएम चे अध्यक्ष श्री. किशोर शेळके व इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले व उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ व शॉल देऊन स्वागत करण्यात आले. 

या रोजगार मेळाव्यामध्ये ३५० उमेदवारांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले आहे त्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या. त्यापैकी ६५ मुलांना शॉर्टलिस्ट केले आहे. आणि १५ ते २० मुलांना लगेचच कामावर रुजू होण्यास सांगितले आहे.

लायन्स क्लब ऑफ पनवेलचे अध्यक्ष एस. जी चव्हाण यांनी आपलया वक्तव्यात सांगितले कि आज येथे २९ कंपन्यांनी या रोजगार मेळाव्यामध्ये भाग घेतलेला आहे. आणि ज्या ३५० उमेदवारांनी ऑनलाईन  नावं नोंदणी केले आहे व जे तरुण आज इथे उपस्थित आहेत त्या तरुणांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन लगेचच त्यांच्या पात्रतेनुसार कंपनीत लावले जाईल.

प्रितमदादा म्हात्रे यांनी आपल्या वक्तव्यात असे म्हटले आहे कि, हा रोजगार मेळावा अवघ्या २ ते तीन दिवसात राबवण्यात आला, आणि गावोगावी फिरत असताना त्यांच्या अस लक्षात आले कि आम्हाला फक्त नोकरी द्या हा एकच शब्द सगळ्यांचा होता त्यामुळे इथे प्रत्येक तरुणाला रोजगार व नोकरी मिळाली पाहीजे केवळ हा प्रामाणिक हेतू हा रोजगार मेळावा भरवण्यामागे आहे. आणि  जर हे काम आपल्या जवळपासच्या ठिकाणी लागले तर आपला वेळ वाचेल आणि त्रासही वाचेल त्यामुळे एस जी चव्हाण यांनी आपल्याला एकूण ४०० जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यादृष्टीतने हा रोजगार मेळावा आपल्याला फायदेशीर ठरेल.  तसेच जो एअरपोर्ट येतोय त्यासाठी त्यांच्यामार्फत जे प्रशिक्षण केंद्र सुरु केल आहे, त्यात कोणत्याही प्रकारचे चार्जेस घेतले जात नाही. त्यामध्ये ४५ जणांना लेटर देऊन  दिल्लीला पाठवण्यात आले आहे. यामध्ये माध्यम फक्त मी आहे मेहनत तुम्हाला करायची आहे त्यासाठी श्री चव्हाण साहेबांची मदत त्यांना लागेल असेही म्हटले आहे.

या रोजगार मेळाव्यामध्ये सहभाग घेतलेल्या कंपनीच्या प्रतिनिधीना सन्मानचिन्ह देऊन त्यांचे आभार मानण्यात आले. तसेच जे उमेदवार सिलेक्ट झाले आहेत त्यांनाही मान्यवरांच्या हस्ते लेटर देऊन त्याचेही सत्कार करण्यात आले.

या कार्यक्रमामध्ये जे एम म्हात्रे, नारायणशेठ घरत हे मान्यवर आवर्जून उपस्थित होते.

व इतर मान्यवर बाळाराम म्हात्रे , प्रदीप पाटील, दत्ता शिंदे, ,रमेश पाटील, चंदू पाटील, रंजना गायकवाड  दत्तात्रेय जांभळे, रामचंद्र गायकवाड,  बाळाराम कुरंगळे , जगदीश पवार, भालचंद्र राऊत, नाना म्हात्रे, मनीष गायकवाड, ओकांसाहेब, अनिल  कुरंगळे, डॉ . स्वप्नील, संगीताताई म्हात्रे, एकनाथ खाने, गुरुनाथ माळी, संतोष मालकर, अनंत गाताडे, व लायन्स क्लब ऑफ पनवेलचे अध्यक्ष ला. एस. जी चव्हाण , ला, डिस्ट्रिक्टचे जीएसटी चेअरपर्सन ला. विजय गणत्रा आणि डिस्ट्रिक्टचे युथ एम्पॉवरमेंटचे ला. नयन कवले, सेक्रेटरी ला. अशोक गिल्डा, ला. नागेश देशमाने,  खजिनदार ला. मनोज म्हात्रे, ला. के एस. पाटील ,  ला अलका चव्हाण, ला. प्रमोद गझहंस, खालापूरच्या अध्यक्षा ला. शिवानी मॅडम, ला. क्लब पाताळगंगेचे अध्यक्ष आणि एनआयपीएम चे अध्यक्ष श्री. किशोर शेळके,  द्रोणागिरीच्या अध्यक्षा मोनिका चौलकर इत्यादी उपस्थित होते.

लायन्स क्लब ऑफ पनवेलचे अध्य्क्ष श्री. एस जी चव्हाण यांनी. पनवेलचे श्री जे एम म्हात्रे, व विविध कंपन्यांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर