दुबार आणि बोगस नोंदणी विरोधात बाळाराम पाटील यांची उच्च न्यायालयात धाव

 https://youtu.be/04YR6sW4SdY?si=qhcIPQtq2CoVC1rV





दुबार आणि बोगस नोंदणी विरोधात बाळाराम पाटील यांची उच्च न्यायालयात धाव 

पनवेल : 

       १८८ पनवेल विधानसभा मतदार संघात ६ लाख ४२ हजार ५७ मतदार येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदान करणार आहेत. प्रसिद्ध यादीतील ८५ हजारांहून अधिक नावे दुबार आणि बोगस असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. शेकाप चे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी महाविकास आघाडी चे वतीने सन्माननीय उच्च न्यायालयात या दुबार आणि बोगस नोंदणी विरोधात धाव घेतली आहे.पनवेलच्या शेतकरी कामगार पक्ष कार्यालयामध्ये बुधवार दिनांक १ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माध्यमांना याबाबत अवगत केले. यावेळी त्यांच्या समवेत पनवेल उरण महाविकास आघाडीचे अध्यक्ष तथा शिवसेना सल्लागार बबन दादा पाटील, शेकाप नेते तथा उद्योजक जे एम म्हात्रे, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायणशेठ घरत, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुदाम गोकुळशेठ पाटील, शेकापचे पनवेल जिल्हा चिटणीस गणेश चंद्रकांत कडू आदी मान्यवर उपस्थित होते.

       माजी आमदार बाळाराम पाटील यांनी निवडणुक आयोगाच्या विभागीय अधिकाऱ्यांच्याकडे अर्ज करून दुबार आणि बोगस नोंदणी विरोधात प्रशासनाचे लक्ष वेधले होते.परंतु अधिकारी वर्गाकडून दुर्लक्ष होण्याची शक्यता असल्याने माजी आमदार बाळाराम पाटील यांनी सन्मा.उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.निवडणूक आयोगाकडे अद्ययावत नोंदणी सॉफ्ट वेअर असल्याने त्याचा वापर करून दुबार आणि बोगस नोंदणी विरोधात अभियान चालविण्यात यावे असे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी याचिकेमध्ये नमूद केले आहे. तूर्तास १८८ पनवेल मतदार संघात २५,८५५ मतदारांची दुबार नोंदणी झालेली आहे. १५०- ऐरोली मतदार संघातील १६०९६ नावे,१९०- उरण मतदार संघातील २७,२७५ नावे आणि १५१- बेलापूर मतदार संघातील १५,३९७ नावे पनवेल मतदार संघात अंतर्भूत झालेली आहेत. या व्यतिरिक्त ५८८ नावांचा कन्नड अथवा अन्य दक्षिण भारतीय भाषांच्यात पत्ता नमूद आहे,तसेच संपूर्ण नाव नमूद नाही. या सर्व नावांना मतदार यादीतून वगळण्यात यावे अशी मागणी बाळाराम पाटील यांनी याचिका क्रमांक WPST No. २८०८०/२०२४ द्वारे केली आहे. 

       या व्यतिरिक्त शेकाप कार्यकर्त्यांनी अध्ययन करून २ हजार एकशे साठ बोगस नावे शोधलेली असून ती देखील वगळण्यात यावी अशी मागणी शेकाप चे मार्फत करण्यात आली आहे. या सोबत २२०० मतदार स्थलांतरित झाल्याचे सकृत दर्शनी आढळून आले आहे. हि सर्व नावे देखील मतदार यादीतून वगळण्यात यावीत अशी बाळाराम पाटील यांनी मागणी केली आहे.

        यावेळी बाळाराम पाटील म्हणाले की लोकशाहीच्या चार स्तंभांपैकी न्यायपालिका आणि माध्यमे अशा दोन भक्कम स्तंभांकडे आम्ही आमची कैफियत मांडली आहे.अधिकारी वर्ग विद्यमान आमदार आणि त्यांच्या शीर्ष नेतृत्वाच्या दबावाखाली काम करत असल्याची आमची भावना आहे.म्हणूनच सेन्सिटिव्ह पोलिंग बूथ वरती सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी आम्ही करत आहोत. उपरोक्त मतांच्या व्यतिरिक्त जवळपास ११ हजार मते आमच्या कार्यकर्त्यांनी दुबार व बोगस असल्याचे शोधून काढले आहे. सकृत दर्शनी एक लाख मते नियमबाह्य पद्धतीनं मतदार यादीत समाविष्ट आहेत. आज देशाचे गृहमंत्री येऊन साम दाम दंड भेद निती वापरा अशी भाषा करत असतील तर सुदृढ लोकशाहीच्या दृष्टीने ते अत्यंत चुकीचे ठरेल.परंतु यावेळेस आम्ही देखील अद्ययावत प्रणाली सह तयार राहणार आहोत.


चौकट:

कोकण पदवीधर मतदार संघाच्या वेळेला देखील आम्ही अशा प्रकारे निवडणूक आयोगाला हाताशी धरून विजय साकारण्याच्या पद्धतीला विरोध केला होता. महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांच्या मतदानाचे वेळी सी के टी हायस्कूल येथे मतदान केंद्र उभारू नये या स्वरूपाची आम्ही मागणी केली होती. आमची मागणी धुडकावल्यानंतर नेमके याच मतदार केंद्रांमध्ये तीन मतदारांच्या नावाने बोगस मतदान झाल्याचे आम्ही उघड केले होते. 

१) राहुल काशिनाथ पाटील 

२) सौरभ संतोष तांबोळी 

३) हॅलो अर्चना सागर चौधरी 

या मतदारांच्या नावावर अगोदरच मतदान झाल्याचे निष्पन्न झाले होते. अत्यंत गंभीर गुन्हा असून देखील निवडणूक आयोगाने याची फारशी दाखल घेतली नाही. आम्ही हा विषय रेटून धरल्यानंतर त्यांना टेंडर वोट करण्याची अनुमती देण्यात आली.


चौकट:

आज मुंबई ऊर्जा मार्ग ली., नैना प्रकल्प, मल्टी मॉडेल कॉरिडोर यांच्या विरोधात आंदोलन करताना सामान्य शेतकरी आणि भूधारक यांच्यासाठी विद्यमान आमदार कधीही सहभागी होत नाहीत. त्यांना जनतेच्या कुठल्याही प्रश्नाशी देणंघेणं नाही त्याच कारण त्यांच्याकडे असणारी एक लाख बोगस व दुबार वोट बँक! 

सुदाम पाटील, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष.


https://youtu.be/04YR6sW4SdY?si=qhcIPQtq2CoVC1rVबोगस मतदार नोंदणी https://youtu.be/04YR6sW4SdY?si=qhcIPQtq2CoVC1rV

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर