उरण विधानसभेत शेकापची प्रचारात आघाडी!* 6 ऑक्टोबरला पदाधिकारी पदनियुक्ती मेळावा
उरण विधानसभेत शेकापची प्रचारात आघाडी!
6 ऑक्टोबरला पदाधिकारी पदनियुक्ती मेळावा
उरण :
महाराष्ट्र मध्ये लवकरच विधानसभेचे बिगुल वाजणार आहे काही ठिकाणी आघाडी होईल काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत अशा परिस्थितीत आपण निवडून येणारच अशा ठिकाणी विविध पक्षांनी आपली मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे.
रायगड मधील उरण विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडी आणि महायुती यामध्ये लढत होणार आहे. यावेळी आपला पारंपारिक मतदारसंघ असल्यामुळे महाविकास आघाडी कडून उरण मधून शेतकरी कामगार पक्षालाच तिकीट मिळेल या अनुषंगाने शेतकरी कामगार पक्षाने उरण विधानसभा क्षेत्रात कंबर कसली आहे.
गणपती मध्ये लोकांच्या भेटीसाठी घेण्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे उरणचे विधानसभेचे उमेदवार श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी आघाडी घेतली आहे. जास्तीत जास्त कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचून आपण केलेले काम लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळेच आज शेतकरी कामगार पक्षाला नवचैतन्य निर्माण झाले आहे. खालापूर, पनवेल आणि उरण या तिन्ही तालुक्यांमध्ये येणाऱ्या गावांमध्ये भेटी देण्यात प्रितम म्हात्रे आघाडीवर आहेत. भेटी दरम्यान तरुण वर्गात त्यांच्या उमेदवारी बद्दल असलेला उत्साह शेतकरी कामगार पक्षातील तरुणांसोबतच आघाडी मधील इतर पक्षीय कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा दिसून येत आहे.
या सर्व घडामोडी दरम्यान पक्ष संघटना बांधणीसाठी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने प्रितम म्हात्रे यांच्यावर जबाबदारी दिली आहे. 6 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता जेएनपीटी टाऊनशिप हॉल उरण येथे पक्षात नव्याने प्रवेश करते झालेले आणि अनुभवी असलेले जुने कार्यकर्ते यांचा नव्याने पक्ष बांधणी करतानाच नवनियुक्त पदाधिकारी मेळावा शेतकरी कामगार पक्षाने मा.आमदार श्री.बाळाराम पाटील आणि शेकाप नेते मा. नगराध्यक्ष श्री जे.एम. म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला आहे. यावेळी जास्तीत जास्त शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन उरण तालुका चिटणीस श्री.विकास नाईक यांनी केले आहे.
*कोट*
उरण विधानसभा हा आमचा शेतकरी कामगार पक्षाचा पारंपारिक मतदार संघ आहे. काही काळासाठी आमचा निसटता पराभव झाल्याने ही जागा पुन्हा मोर्चे बांधणी करून शेतकरी कामगार पक्षाचा आमदार महाविकास आघाडीच्या रूपाने निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वजण काम करत आहोत. लवकरच उरण विधानसभेवर लालबावटा फडकला जाईल.
श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे
खजिनदार,शेतकरी कामगार पक्ष रायगड
Comments
Post a Comment