# महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान 20 नोव्हेंबरला मतदान होणार आणि 23 नोव्हेंबरला निकाल # आज मध्यरात्रीपासून आचारसंहिता सुरू
# महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान 20 नोव्हेंबरला मतदान होणार आणि 23 नोव्हेंबरला निकाल
# आज मध्यरात्रीपासून आचारसंहिता सुरू
मुंबई: ज्याची आतुरतेने वाट बघत होते मतदार ते म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची अखेर घोषणा झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र आणि झारखंड येथील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. २० नोव्हेंबर २०२४ ला राज्यात मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यात एका टप्प्यात निवडणुका पार पडतील. तर, २३ नोव्हेंबर २०२४ ला मतमोजणी होणार.
महाराष्ट्रात किती मतदार?
• महाराष्ट्रात एकूण ९.६३ कोटी मतदार
• महिला मतदार - ४.६६ कोटी
• पुरुष मतदार - ४.९७ कोटी
• युवा मतदार - १.८५ कोटी
• नव मतदार - २०.९३ लाख
राज्यातील मतदान केंद्रांची माहिती
• महाराष्ट्रात १ लाख १८३ मतदान केंद्र
• शहरी मतदान केंद्र - ४२, ६०४
• ग्रामीण मतदान केंद्र - ५७,५८२
• महिला अधिकाऱ्यांची मतदान केंद्र - ३८८
• नव अधिकाऱ्यांची मतदान केंद्र - २९९
प्रचार तोफा कधी थंडावणार?
निवडणुका या येत्या महिना भरात पार पडणार असल्याने राजकीय पक्षांकडे प्रचारासाठी खूप वेळ शिल्लक आहे. १८ नोव्हेंबरला प्रचार तोफा थंडावतील.
Comments
Post a Comment