राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (RMBKS) चे राष्ट्रीय उपाध्यक्ष कामगार नेते संतोषभाई घरत व रायगड जिल्हा अध्यक्ष गणेश यशवंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली रिफर डिव्हिजन कामगारांचा रू 5700/- वेतनवाढीचा करार संपन्न.
# राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (RMBKS) चे राष्ट्रीय उपाध्यक्ष कामगार नेते संतोषभाई घरत व रायगड जिल्हा अध्यक्ष गणेश यशवंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली रिफर डिव्हिजन कामगारांचा रू 5700/- वेतनवाढीचा करार संपन्न.
# राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ च्या वतीने मे. ई.एफ.सी लॅाजिस्टीक इंडिया प्रा. लि. मु. वेश्वी, ता. उरण या कंपनी मधील रिफर डिव्हिजन कामगारांचा रू 5700/- वेतनवाढीचा करार संपन्न.
उरण / प्रतिनिधी
राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (RMBKS) चे राष्ट्रीय उपाध्यक्ष कामगार नेते संतोषभाई घरत व रायगड जिल्हा अध्यक्ष गणेश यशवंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि कामगार संघटनेचे राष्ट्रीय महासचिव एन. बी. कुरणे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 25/09/20234 रोजी RMBKS कार्यालय जासई उरण येथे वेतनवाढ करार संपन्न झाला.
या प्रसंगी मे. ई.एफ.सी लॅाजिस्टीक प्रा. लि. चे व्यवस्थापक हेमंत राणे, कमर्शियल हेड शंकर पिल्लाई व कामगार प्रतिनिधी मनोहर नाईक, के. जानकीरामन हे उपस्थित होते.
सदर करारामध्ये रू. 5700/- ची भरघोस वाढ झाली. बेसीकमध्ये 50% रक्कम व इतर भत्त्यांमध्ये 50% आणि काळावधी 3 वर्षाकरीता करण्यात आला. ओटी, महागाई भत्ता, बोनस, रेनकोट, सेफ्टी शुज, ईतर सुविधा तसेच सरकारी नियमा नुसार सर्व फायदे देण्याचे व्यवस्थापनाने मान्य केले.
राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (RMBKS) च्या नेतृत्वामुले कामगार वर्ग आनंद साजरा करीत आहे.
Comments
Post a Comment