# उरणच्या आदित्य घरत ने मिळवले गोल्ड मेडल "# पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी हरियाणा येथे करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व

 



# उरणच्या आदित्य घरत ने मिळवले गोल्ड मेडल
"# पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी हरियाणा येथे करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व

 पनवेल  :     आज महाराष्ट्रातील तरुण पिढी विविध क्षेत्रात आपले प्राविण्य मिळवत आहे. यामध्ये रायगड मधील तरुण सुद्धा पाठी नाहीत. महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धा चेंबूर येथे ऑगस्टमध्ये झाली होती यामध्ये महाराष्ट्रातील अनेक पॉवरलिफ्टर सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये आदित्य अनंत घरत याने  गोल्ड मेडल पटकावले. 13 सप्टेंबर 2024  रोजी हरियाणा येथे नॅशनल पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी आदित्यला मिळाली आहे. 
     आदित्यने केलेल्या या  उत्कृष्ट कामगिरीबद्दल शेतकरी कामगार पक्षातर्फे पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मा.आमदार श्री.बाळाराम पाटील, मा.नगराध्यक्ष श्री जे.एम. म्हात्रे, कृ.उ.बा.स. सभापती श्री.नारायणशेठ घरत, पनवेल पं.स.सभापती श्री.काशिनाथ पाटील,शेकाप महाराष्ट्र राज्य खजिनदार श्री.अतुल म्हात्रे, शेकाप रा.जि. खजिनदार श्री.प्रितम ज.म्हात्रे, शेकाप जिल्हा चिटणीस श्री.गणेश कडू आणि शेकाप महिला आघाडी  यांनी सन्मान करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर