बाप्पा हा तर स्त्री सबलीकरणाचा पुरस्कर्ता.. # करंजाडेतील महिलांनी घेतले श्री गणेशाचे दर्शन
*बाप्पा हा तर स्त्री सबलीकरणाचा पुरस्कर्ता*..
*करंजाडेतील महिलांनी घेतले श्री गणेशाचे दर्शन*
पनवेल/प्रतिनिधी -- स्त्री हे मुळात आदिशक्तीचे रूप आहे. ती प्रसंगी दूर्गा बनते, तर कधी गौरी आहे. काही प्रसंगी महिलांना दुर्गा अवतार देखील प्रकट करावा लागत असल्याचे करंजाडे सेक्टर सहा येथील गावदेवी सार्वजनिक गणेशोत्सव करंजाडेचा राजा येथे महिलांनी गणेशाचे दर्शन देत महिला सक्षमीकरणाचे धडे देण्यात आले.
करंजाडे वसाहतीतील सेक्टर 6 परिसरातील करंजाडेचा राजा गावदेवी गणेशोत्सवानिमित्ताने गेल्या दहा दिवस वेगवेगळे सामाजिक उपक्रम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांचे खेळ, जेष्ठ नागरिकांसाठी तसेच लहान मुलांसाठी खेळ त्याचबरोबर सामाजिक संदेश देणाऱ्या उपक्रम गेले दहा दिवस आयोजिले होते. त्याचबरोबर मंडळाच्या महिलांनी विशेष करून राज्यामध्ये महिलांवर होणाऱ्या अतिचार थांबविण्यासाठी शासनाने उपाययोजना कडक कायद्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी केली. त्याचबरोबर महिलांनी कश्या प्रकारे जागृत राहावे याचे मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर महिला संरक्षणाचे धडे देण्यात आले. यावेळी महिलांनी एकत्रित येत श्री गणेशाचे दर्शन घेतले.
Comments
Post a Comment