मदरसा ए आयशा मस्जिद व श्री साई ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिर एक बुंद खून,इंसानं की जान बचाने के लिए ! रक्तदान करा, जीवनदान करा ! अनिसा शेख

 



मदरसा ए आयशा मस्जिद व श्री साई ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिर


एक बुंद खून,इंसानं की जान बचाने के लिए !

रक्तदान करा, जीवनदान करा ! अनिसा शेख 


नवी मुंबई/साबीर शेख:-


ईद ए मिलाद अर्थात प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंती 

जगाला सामाजिक ऐक्य आणि सदभावनेचं प्रतीक असणाऱे हजरत मोहंमद पैगंबर त्यांनी  दिलेला समता-बंधुत्व-प्रेमाचा संदेश सामाजिक सलोखा निर्माण करणारा ठरावा म्हणून जगभरात लोकोपयोगी ,मानव कल्याणकारी अनेक अभिनव उपक्रम मुस्लिम समाजाच्या वतीने राबविले जातात. त्याचप्रमाणे तळोजा फेज 1 सेक्टर 2 येथील मदरसा ए आयशा मस्जिद येथे मुस्लिम बांधवांनी " सर्वश्रेष्ठ दान रक्तदान " या संकल्पनेतून उपक्रम यशस्वी केला.रक्तदात्यांच्या स्तुत्य कार्य समाजाला प्रोत्साहन व प्रेरणादायी ठरत असल्याने यावेळी त्यांचे सत्कार व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमात अल्पसंख्याक नेत्या सुलताना चांद बीबी वंशज ज्येष्ठ समाजसेविका अनिशा शेख यांनी उपस्थिती दाखवत रक्तदात्यांचे प्रशस्तीपत्रक देऊन कौतुक केले व सर्वांना

ईद ए मिलाद च्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

आयोजक म्हणून अफरोझ भाई,नियाझुद्दीन नडवी, दिलावर चौगुले ,गुल्फाम पारकर,सलीम  दलवी, शोएब सुर्वे, माजदार मुलाजी,हाजी सलीम रतांशी,नौफिल सय्यद तसेच एम. जी. एम.श्री. साई ब्लड सेंटर सदस्य व अल्पसंख्याक समाज व संस्था ,प्रसार माध्यम प्रतिनिधी व स्थानिक सर्व धर्मियांनी मिळून महारक्तदान शिबिरात मोठया प्रमाणात सहभाग घेतला.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर