लोकनेते दि बा पाटील सभागृह जासई येथे भव्य आगरी समाज मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न
लोकनेते दि बा पाटील सभागृह जासई येथे भव्य आगरी समाज मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न
अखिल आगरी समाज परिषद आयोजित भव्य आगरी समाज मेळावा
उरण/प्रतिनिधी
रविवार दि.१ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी २.०० वाजता लोकनेते दि.बा.पाटील सभागृह मु.जासई,ता.उरण,जि.रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराज,कुळ कायद्याचे जनक नारायण नागु पाटील,बॅरिस्टर ए टी पाटील,लोकनेते दि बा पाटील क्रांतिवीर हुतात्मे यांच्या फोटोंना पुष्पहार व दिप प्रज्वलन आगरी समाजाचे नेते मा.पालकमंत्री मा.श्री.गणेशजी नाईक यांच्या हस्ते समाजाचे अध्यक्ष मा.श्री.दशरथ दादा पाटील,मा.खासदार मा.श्री.रामशेठ ठाकूर,मा मंत्री मा.खासदार माजी मंत्री मा.श्री.जगन्नाथजी पाटील,सल्लागार श्री.जे एम म्हात्रे,आमदार मा.श्री.प्रशांत ठाकूर,कामगार नेते संतोष भाई घरत महेंद्र घरत, संदेश ठाकुर अतुल मनोहर भोईर प्रितम म्हात्रे नरेश घरत पाटील,सुरेशदादा पाटील,कार्याध्यक्ष जे डी तांडेल,सरचिटणीस दिपक म्हात्रे,संतोष केणे,गुलाब वझे,विजय पाटील,डॉ.सोन्या पाटील,दयानंद चोरघे, अरुण पाटील,मनोहर पाटील,डॉ.यशवंत सोरे,डॉ.प्रा.विनोद पाटील,हनुमान पाटील,विशुभाऊ म्हात्रे,राजेश गायकर,दिपक पाटील,विनोद म्हात्रे,भूषण पाटील,सुशांत पाटील,शरद म्हात्रे,डॉ.तपन पाटील,विजय गायकर,प्रताप पाटील,संतोष घरत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
मान्यवरांचा सन्मान आयोजकांच्या हस्ते आणि नवनिर्वाचित खासदार मा.श्री.संजय दिना पाटील आणि मा.श्री.सुरेश (बाळ्या मामा) गोपीनाथ म्हात्रे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
अखिल आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष श्री.दशरथ दादा पाटील यांनी आगरी समाज काल,आज,उद्या सांगून प्रास्तविक केले,नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि बा पाटील साहेबांचेच नाव लागणार यात शंकाच नाही.आगरी समाजात सुधारणा होत असून सर्व क्षेत्रात प्रगती करीत आहे.असे सांगितले.आमदार प्रशांत ठाकूर यांनी दि बा पाटील साहेबांच्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आंदोलन यशस्वी केले तसेच आपल्या समाजाची एकी अशीच राहिले पाहिजे असे सांगितले. नवनिर्वाचित खासदार यांनी आम्ही सदैव समाजाबरोबर आहोत.महिन्यातून एकदिवस समाजासाठी देऊ असे सांगितले.
आगरी समाजाच्या सर्व मागण्या मान्यवरांच्या व नवनिर्वाचित खासदार यांच्या उपस्थितीत मांडण्यात आल्या.लाखोंच्या संख्येने आंदोलन केल्यानंतर राज्य सरकार आणि केंद्र सरकारला समाजाच्या मागण्या मान्यच कराव्या लागतीलच असे नवनिर्वाचित खासदार यांनी सांगितले.सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने भिवंडी तालुक्यातील आगरी समाज उपस्थितीत राहिला.असे अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणात सांगितले.
भव्य आगरी समाज मेळाव्यास मोठ्या संख्येने आजी,माजी खासदार,आमदार,मान्यवर उपस्थित राहून यशस्वी केल्याबद्दल अखिल आगरी समाज अध्यक्ष श्री.दशरथ दादा पाटील आणि सर्व पदाधिकारी यांनी आभार व्यक्त केले.
जय आगरी, जय दि बा...!
Comments
Post a Comment