राष्ट्रीय मास्टर्स पॉवरलिफ्टिंग"चे रौप्य पदक रायगडचे महेश कृष्णा पाटील यांना प्राप्त
# राष्ट्रीय मास्टर्स पॉवरलिफ्टिंग"चे रौप्य पदक रायगडचे महेश कृष्णा पाटील यांना प्राप्त
मुंबई : राष्ट्रीय मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धा (४०/५०/६०/७० वर्षावरील स्पर्धक) पावर लिफ्टिंग इंडिया मान्यतेने नुकतीच इंदौर (मध्य प्रदेश) येथे 21 जुलै 2024 ते 27 जुलै 2024 या कालावधीत पार पडली.
या स्पर्धेत मास्टर 1 (40वर्षावरील.,) स्पर्धेच्या 59किलो पुरुष वजनी गटात "महेश सविता कृष्णा पाटील"या स्पर्धकाने 427.5 किलो वजन उचलून द्वितीय क्रमांकाचा रौप्य पदक पटकावले आहे. स्कॉट प्रकारात त्यांनी 170 किलो, बेंच प्रेस प्रकारात 80 किलो आणि डेडलीफ्ट प्रकारात 177.5 असे वजन घेतले. त्यामुळे त्यांना व बेंचप्रेस प्रकारात रौप्यपदक आणि डेडलीफ्ट प्रकारात सुवर्णपदक प्राप्त झाले त्यांना या स्पर्धेची एकूण चार पदक प्राप्त झाले आहेत .यापूर्वी सुद्धा त्यांनी जिल्हा राज्य राष्ट्रीय स्पर्धात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुद्धा पदक प्राप्त केलेले आहे. खालापूर तालुक्यातील आपटी (डोनवत) गावचे रहिवासी असलेले महेश पाटील यांच्या रौप्य पदकाबाबत पॉवर लिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन यांनी आनंद व्यक्त केला आहे.
पॉवरलिफ्टिंग खेळातील यशाबाबत महेश पाटील यांनी असे नमूद केले की अनंत चाळके (मुंबई), राज्य संघटनेचे सचिव संजय सरदेसाई आणि रायगड संघटनेचे अध्यक्ष गिरीश वेदक आणि सहसचिव सचिन भालेराव, सचिव अरुण पाटकर यांनी मोलाचे सहकार्य मार्गदर्शन केले आहे. तसेच शिवतेज फिटनेस सेंटर वनवटे चे संचालक निलेश कदम हे सुध्दा खूप प्रोत्साहन देण्याचे काम करत आहेत.
Comments
Post a Comment