# गिरीष शुभदा शरद वेदक माजी पॉवरलिफ्टिंग खेळाडू सेवानिवृत्त # दी न्यू इंडिया अशुरन्स बेलापूर चे असिस्टंट मॅनेजर "श्री गिरीश शुभदा शरद वेदक "हे नुकतेच 35 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून दिनांक 31 जुलै 2024 रोजी निवृत्त झाले.
# गिरीष शुभदा शरद वेदक माजी पॉवरलिफ्टिंग खेळाडू सेवानिवृत्त
# दी न्यू इंडिया अशुरन्स बेलापूर चे असिस्टंट मॅनेजर "श्री गिरीश शुभदा शरद वेदक "हे नुकतेच 35 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून दिनांक 31 जुलै 2024 रोजी निवृत्त झाले.
नवी मुंबई /प्रतिनिधी
गिरीश वेदक हे पॉवरलिफ्टींग स्पोर्ट्स असोसिएशन रायगड चे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन चे उपाध्यक्ष आहेत.
सेवानिवृत्तीनंतर "पॉवरलीफ्टींग" खेळासाठी मी माझे जास्तीत जास्त योगदान देणार आहे असा गिरीश वेदक यांनी निश्चय केला आहे. पॉवरलिफ्टिंगची स्पर्धा खेळलेले गिरीश वेदक यांना पॉवरलिफ्टिंग या खेळाबद्दल खूप आस्था आहे. रायगड जिल्ह्यातून अनेक खेळाडू निर्माण होऊन झाले पाहिजेत खेळाडूंना योग्य ते सहकार्य झाले पाहिजे या मताचे ते पुरस्कर्ते आहेत आणि त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
पॉवरलिफ्टिंग रायगडचे कार्याध्यक्ष यशवंत मोकल कार्यकारणी सदस्य सुभाष टेंबे,सहसचिव सचिन भालेराव सचिव अरुण पाटकर यांनी" गिरीश शुभदा शरद वेदक" यांचे* *निवासस्थानी जाऊन हृद्य सत्कार केला आणि त्यांना पुढील काळासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी त्यांचे जेष्ठ बंधू नितीन वेदक, वहिनी सौ.ज्योती नितीन वेदक, पुतण्या कल्पेश नितीन वेदक, सौ. मिताली कल्पेश वेदक आणि आई शुभदा शरद वेदक उपस्थित होते. तसेच शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय पदक विजेते पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगड चे हितचिंतक माजी कक्ष अधिकारी "सतीश मुरलीधर पाताडे" आणि महाराष्ट्र संघटनेचे सचिव, आंतरराष्ट्रीय पंच आणि *शिवछत्रपती पुरस्कार, *प्राप्त,पॉवरलिफ्टिंग* *रायगड चे मार्गदर्शक संजय सरदेसाई यांनी सुद्धा "गिरीश शुभदा शरद वेदक" यांना पुढील काळासाठी जिल्हा व राज्य संघटनेच्या कामासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Comments
Post a Comment