आशियाई पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत रायगडची अमृता"सर्वोत्तम बेस्ट लिफ्टर"
आशियाई पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत रायगडची अमृता"सर्वोत्तम बेस्ट लिफ्टर"
मुंबई : साऊथ आफ्रिका येथे ०५ ते १३ जुलै २०२४ या कालावधीत या दरम्यान आशिया पॅसिफिक आफ्रिकन क्लासिक आणि इक्विप पॉवरलिफ्टिंग स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत रायगडची शेलू वांगणीची रहिवासी अमृता माधुरी ज्ञानेश्वर भगत हिने 47 किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत अमृता भगत हिने जूनियर इक्विप गटात स्पॉट प्रकारापेक्षा 122.5 किलो वजन, बेन प्रेस प्रकारात 67.5 किलो वजन, आणि डेडली प्रकारात 132.5 किलो वजन घेतले. तिने एकूण 322.5 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. त्याचबरोबर "एशियन बेस्ट लिफ्टर"हा किताब सुद्धा प्राप्त केला. अमृता भगत ची ही दुसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा होतीआणि तिने पदकांची परंपरा कायम राखली यासाठी रायगडचे माजी राष्ट्रीय खेळाडू माधव गोविंद पंडित यांनी आनंद व्यक्त केला. अमृता भगतीला खोपोली मधील विक्रांत अनिल गायकवाड यांचे मार्गदर्शन असून ती अतिशय खडतर मेहनत घेते. रायगडच्या महिला खेळाडूला पहिल्यांदाच आशियाई स्पर्धेत किताब मिळाला आहे. याबद्दल पावर लिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशनचे क्रीडा प्रेमी अध्यक्ष आणि माजी राज्य खेळाडू गिरीश शरद वेदक यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्याचबरोबर इतर पदाधिकारी सहसचिव सचिन भालेराव, खजिनदार राहुल गजरमल, सदस्य संदीप पाटकर, सुभाष टेंबे(माणगाव), दत्तात्रय मोरे(महाड), कार्याध्यक्ष यशवंत मोकल (पनवेल), उपाध्यक्ष श्रीनिवास भाटे(कर्जत) आणि सचिव अरुण पाटकर यांनी तिचे खास अभिनंदन व्यक्त केले आहे. "अमृता माधुरी ज्ञानेश्वर भगत" यांनी मिळवलेल्या यशाबाबत योग्य तो गौरव करण्यात येणार आहे. असे त्यांनी सांगितले. अमृताच्या यशाबाबत महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी श्री संजय सरदेसाई यांनी यांनी सुद्धा आनंद व्यक्त करून मेहनती खेळाडूला यश मिळाले असे मत व्यक्त केले.
Comments
Post a Comment