सुहास जोशी (ज्येष्ठ क्रीडा पत्रकार) खेळाडू विजया नर आणि विलास दळवी यांना पॉवरलिफ्टिंगचा जीवनगौरव पुरस्कार
सुहास जोशी (ज्येष्ठ क्रीडा पत्रकार) खेळाडू विजया नर आणि विलास दळवी यांना पॉवरलिफ्टिंगचा जीवनगौरव पुरस्कार
मुंबई : महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या वतीने राज्यस्तरीय सीनियर इक्विपस्पर्धा दिनांक २९ ते ३० जून २०२४ या कालावधीमध्ये स्थळ- नागरिक सहाय्य केंद्र संचालित ज्ञानेश्वर विद्यालय, रफि किडवाई मार्ग वडाळा मुंबई ४०००३१या ठिकाणी संपन्न झाली.या स्पर्धेच्या वेळी पॉवरलिफ्टिंग* *खेळामध्ये आपल्या वैयक्तिक कामगिरी** *द्वारे महाराष्ट्राचे नाव अनेक वेळा राष्ट्रीय स्पर्धेत उज्वल केलेले खेळाडू विलास दळवी आणि महिला खेळाडू आंतरराष्ट्रीय पदक विजेते, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त ,विजया नर* *(सेवानिवृत्त ,कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन)यांना जीवन गौरव पुरस्कार पॉवरलिफ्टिंग* *खेळातील कामगिरी बाबत संघटनेच्या वतीने प्रदान करण्यात आला.त्याचबरोबर संघटनेचे हितचिंतक आणि ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुहास जोशी.यांना सुद्धा "जीवन गौरव पुरस्कार" क्रीडा* **पत्रकारिते बाबत देण्यात आला. संघटनेने* *पत्रकारितेमध्ये हा प्रथमच पुरस्कार दिला.त्याबद्दल सुहास जोशी यांनी आनंद* *व्यक्त केला आहे.*
*सुहास जोशी हे*
**सध्या दैनिक महाराष्ट्र स्पोर्ट्स, औरंगाबाद चे मुंबई विभागाचे विशेष प्रतिनिधी आणि सल्लागार म्हणून कार्यरत आहेत*
*शाल व सन्मान चिन्ह श्रीफळ,पत्नीसाठी* *सौभाग्य लेण या सोबत रोख रक्कम देण्यात आली. या पुरस्काराने क्रीडा** *पत्रकार सुहास* "*जोशी, तसेच माजी खेळाडू विलास दळवीआणि आणि विजया नर यांनी संघटने कडे* *आपुलकीची भावना व्यक्त करून संघटनेचे आभार मानले. तसेच* *जीवनगौरव पुरस्काराची प्रथा संघटनेने सुरू केली* *आहे त्याबद्दल संघटनेचे कौतुक केले*.
*यापूर्वी महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशनने*
*जीवन गौरव पुरस्काराने* *2020/21मध्ये* *शिवछत्रपती क्रीडा* *कार्यकर्ता पुरस्कार प्राप्त मधुकर पाटकर सर (ठाणे) दादोजी कोंडदेव.पुरस्कार प्राप्त दिलीप केळुसकर सर(मुंबई)*
*2022-23 मध्ये विश्वनाथ सावंत(राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू मुंबई)स्व.नरेश विनरकर (राष्ट्रीय खेळाडू मुंबई),*
*2023/24 साठी श्री* *विलास दळवी, श्रीमती विजया नर, आणि.पत्रकारितेचा पहिलाच जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ** *क्रीडा पत्रकार* *सुहास जोशी(मुंबई) यांना दिला.*
या सर्वांना जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबाबत पॉवर
लिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगड ने त्यांचे अभिनंदन केले आहे.
Comments
Post a Comment