उद्योजक विजय लोखंडे यांच्या व्यावसायिक भागीदाराचा मुलगा झाला लंडनमध्ये खासदार






उद्योजक विजय लोखंडे यांच्या व्यावसायिक भागीदाराचा मुलगा झाला लंडनमध्ये खासदार

पनवेल/जितेंद्र नटे 

पनवेल औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष,उद्योजक विजय लोखंडे यांचे व्यावसायिक भागीदार व अनिवासीय भारतीय उद्योजक हरभजनसिंग संधेर यांचा मुलगा लंडनमध्ये खासदार झाल्याने पनवेल औद्योगिक वसाहतीमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

उद्योजक हरभजनसिंग संधेर हे पनवेल औद्योगिक वसाहतीचे सदस्य आहेत.नुकत्याच लंडनमध्ये ( ब्रिटन) संसदीय निवडणुका झाल्या,त्यात उद्योजक हरभजनसिंग संधेर यांचा धाकटा मुलगा जीवन संधेर हा लेबर पार्टीतर्फे लॉफबरो येथून निवडून आला आहे.तो पहिल्यांदाच निवडणुकीसाठी उभा राहिला आणि निवडूनही आला.पनवेल औद्योगिक वसाहतीसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.जीवन संधेर हा खासदार म्हणून निवडून आल्याबद्दल पनवेल औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विजय लोखंडे यांनी खास अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.व्यवसायानिमित्त पनवेल औद्योगिक वसाहत आणि लंडन असं उद्योगाच एक नातं तयार झाले आहे.जीवन संधेर हा तरुण असून अगदी कमी वयात निवडून आला आहे,यापूर्वी तो लंडन येथील शासकीय सेवेत काम करीत होता.तो खासदार झाल्याने पनवेल औद्योगिक वसाहतीमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर