महाविकास आघाडीने आमदारkey ची संधी दिल्यास भूमिपुत्र प्रितम जनार्दन म्हात्रे उरणमधून आमदार म्हणून जिंकू शकतात #रायगड मत - संपादकीय संपादक - जितेंद्र नटे

 




रायगड मत - संपादकीय 

संपादक - जितेंद्र नटे 

raigamat.page

महाविकास आघाडीने आमदारkey ची संधी दिल्यास भूमिपुत्र प्रितम जनार्दन म्हात्रे उरणमधून आमदार म्हणून जिंकू शकतात 

लोकशाहीत काहिही घडू शकतं. नरेंद्र माेदी तिस-यांदा पंतप्रधान झाले मात्र त्यांना घाम फुटला. महाराष्ट्राने त्यांना राेखलं आहे. जेव्हा अंहकार हाेताे तेव्हा जनता आपली जागा दाखवत असते. याच धर्तीवर महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूने काैल देत महायुतीच्या नेत्यांना घाम फाेडला आहे. सुनिल तटकरे जास्त ताकदवार नव्हते, तर अनंत गिते यांची ताकद कमी पडली. म्हणजे हे सिध्द झाले आहे की उमेद्वार हा ताकदवार असला पाहिजे. अगदी सगळ्याच बाजूने. नुसतं काम असून नाही तर पैसा फेकणारा व्यक्तीिशवाय आज जिंकणेच कठीण झाले आहे. आजच्या मितीला पहाता श्रीरंग बारणे हे मावळ मतदार संघातून जिंकले खरे मात्र त्यांना ब-याच ठिकाणाहून कमी मतदान झालेले दिसत आहे. उरणमध्ये तर महािवकास आघाडीला जनतेने डाेक्यावर घेतले आहे. शेकाप, शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) हे एकत्र अआल्यामुळे बराच फरक पडला अाहे. बारणे हे दाेन वेळा खासदार हाेते. तरी त्यांना घाम फुटला हाेता. तसेच पनवेल मतदार संघामधून अामदार प्रशांत ठाकूर, रामशेठ ठाकूर यांची जबरदस्त मदत िमळाली नसती तर त्यांचा पराजय निश्चित झाला असता. रामशेठ ठाकूर यांनी पनवेलचा गड आपल्या वैयक्तीक ताकदीने साम, दाम, दंड, भेद आणि पैसा याचा पुरेपर वापर करून बरेच वर्षे बांधून ठेवला आहे. अन्यथा पनवेलमध्येही खूप कमी मतदान झाले असते. त्यामुळे भविष्यात पनवेल मधून महायुतीचा आमदार येईल, असे चित्र चत्र आहे.  


मात्र उरण मतदार संघाचा विचार केला तर येथे महेश बालदी हे भाजप पुरस्कृत अपक्ष आमदारा आहेत. मात्र जनतेने त्यांना नाकारले आहे. आममदारकीच्या निवडणुकीला फक्त तीन महिने रािहले आहेत. उरणमध्ये स्थानिक भूमिपुत्र हवाय अशी कुजबुज सद्या सुरु आहे. तसेच नव्या दमाचा, ताकदवार आणि सर्वच स्थरावर झाेकून देणारा असा उमेद्वार असवा अशी उरणकरांची मनधारणी आहे. मागील निवडणुकीत मनाेहर शेठ भाेईर शिवसेना), विवेक पाटील (शेकाप) तर महेश बालदी अपक्ष असे उभे राहिले. मतांचे विभाजन झाले आणि महेश बालदी हे विजयी झाले. मात्र आता तशी परिस्थीती नाही. जर महािवकास आघाडी एकत्र प्लानिंग करुन लढले तर महाराष्ट्रात बरेच आमदार जिंकूण येतील. यातच उरणमध्ये प्रितम जनार्दन म्हात्रे हे नाव पुढे येत आहे. अनेक लाेकांची इच्छा आहे की, ते आमदार व्हावेत. आमदारीकीला साजेल असे त्यांचे, कर्तृत्व, वक्तृत्व आणि नेतृत्वही आहे. ही झाली नाण्याची एक बाजू. तर दुसरी बाजू आहे ती आर्थिक ताकद, आणि यामध्येही प्रितम म्हात्रे कुठे कमी पडणार नाहीत. शिवसेनाला भावनिक ताकद मिळाली पण उमेद्वार तर आर्थिक सक्षम आणि जनतेपर्यंत पाेहचणारा नसेल तर सर्व काही असून ताे पराजित हाेऊ शकता. त्याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे अनंत गिते. अनंत गिते हे अनेक वेळा भावनिक राजकारण करुन जिंकले. मात्र आता ते दिवस राहिले नाहीत. बुथपर्यंत माणसे, मतदार पाेहचवता यायला पाहिजेत. त्यांचा खर्च करता यायला पाहिजे. जाे ते करताे, ताे जिंकताे. म्हणूनच ससुनिल तटकरे जिंकले, म्हणूनच बारणे जिंकले वाघेरे कमी पडले. तटकरेंची मते फिक्स केलेली हाेती. त्यांचे मतदार काेण, कुठले त्यांना मुंबईवरून गावाला आणण्याचा खर्च बाकीची व्यवस्था ही त्यांनी चाेख केली होती. बाहेर हवा कितीही वेगळी असली तरी बुथ पर्यंत शिवसेनेचे मतदार पाेचले नव्हते तर सुनिल तटकरेंचे मतदार पाेचले, त्यांना पाेचविण्यात ते यशस्वी ठरले म्हणूनच तर ते जिंकले आणि अनंत गिते पाच वर्षातून एकदा येतात खर्चही देत नाहीत मग कसे कार्यकर्ते टिकणार.


या सर्व गाेष्टींचा अभ्यास केला तर उरण मतदार संघामध्ये महाविकास आघाडीचा सक्षम तरुण तडफदार, चरित्रवाण, सगळ्यांशी चांगले संबंध असणारा आणि खर्च करणारा असा उमेद्वार दिल्यास ताे उमेद्वार जिंकू शकताे. या सर्व गगोष्टींचा विचार केला तर स्थानिक भूमिपुत्र प्रितम जनार्दन म्हात्रे हे नाव आता पुढे येऊ लागले आहे. तसे झाल्यास उरणकरांना आपल्या हक्काचा माणूस मिळाल्याशिवाय राहणार नाही. उरण जिंकायचे असेल तर महािवकास आघाडीकडे सद्यातरी दुसरा पर्याय नाही आणि तशी संधी मिळाल्यास प्रितम दादा या संधीचे सोने केल्याशिवाय आणि भूमिपुत्रांसाठी अहोरात्र राबराब राबल्याशिवाय राहणार नाहीत. 

raigamat.page 



Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर