# श्रीरंग बारणे यांनी वापरली वेगळीच 'ट्रिक', म्हणून झाली त्यांची पुन्हा हॅट्रिक, तब्बल ९६ हजार ६१५ मतांनी विजय मिळवला # घासून नाही ठासून आलो, कार्यकर्त्यांची जबरदस्त घोषणाबाजी # विधानसभा आमदारकी निहाय मतदान पहा...
# श्रीरंग बारणे यांनी वापरली वेगळीच 'ट्रिक', म्हणून झाली त्यांची पुन्हा हॅट्रिक, तब्बल ९६ हजार ६१५ मतांनी विजय मिळवला
# घासून नाही ठासून आलो, कार्यकर्त्यांची जबरदस्त घोषणाबाजी
# विधानसभा आमदारकी निहाय मतदान पहा...
रायगड मत
पनवेल / जितेंद्र नटे
मावळचा खासदार कोण होणार?
याबाबत उत्सुकता लागून होती. पिंपरी- मावळ लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस दिसून येत होती, परंतु महायुतीच्या श्रीरंग बारणे यांनी तब्बल ९६ हजार ६१५ मतांनी विजय मिळवला आहे. बारणे यांनी चिंचवड, पनवेल, आणि पिंपरी विधानसभा मदारसंघातून मोठी आघाडी घेत विजयश्री खेचून आणला आहे. संजोग वाघेरे पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरीतून मतदारसंघातून त्यांना पिछाडी भेटली आहे. मावळ विधानसभा मतदारसंघातून वाघेरे यांना चांगले मतदान भेटले आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात धिम्या गतीने मतमोजणी सुरू होती. पहिल्या फेरीपासूनच श्रीरंग बारणे यांनी आघाडी घेतली. ही आघाडी कायम ठेवत शेवटच्या टप्प्यातील फेऱ्यांमध्ये देखील भरणे आघाडीवर राहिले. विजय दृष्टीपथात असल्याचा अंदाज आल्यानंतर श्रीरंग बारणे हे समर्थकांसह बालेवाडी येथील मतमोजणी केंद्रावर आले. यावेळी त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष करत घोषणाबाजी केली. महायुतीचा विजय असो, झाली रे झाली हॅट्ट्रिक झाली, घासून नाही ठासून आलो, अशा घोषणा समर्थकांनी दिल्या.
फटाके वाजवून कार्यकर्त्यांनी केला आनंद साजरा
महायुतीच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मतमोजणी केंद्र परिसरात जल्लोष केला. गुलाल उधळत तसेच फटाके वाजवत आनंद व्यक्त केला. सकाळपासून उत्सुकता असलेल्या या निकालाचे चित्र दुपारी दोनच्या सुमारास स्पष्ट झाल्याचे दिसून आले.
विधानसभा आमदारकी निहाय मतदान पहा...
पनवेल विधानसभा मतदारसंघ
श्रीरंग बारणे – 1 लाख 50 हजार 924
संजोग वाघेरे – 1 लाख 19 हजार 886
(बारणे आघाडी – 31 हजार 38)
कर्जत विधानसभा
श्रीरंग बारणे – 75 हजार 534
संजोग वाघेरे – 93 हजार 194
(वाघेरे आघाडी – 17 हजार 660)
उरण विधानसभा
श्रीरंग बारणे – 91 हजार 285
संजोग वाघेरे – 1 लाख 4 हजार 535
(वाघेरे आघाडी – 13 हजार 250)
मावळ विधानसभा
श्रीरंग बारणे – 94 हजार 800
संजोग वाघेरे – 89 हजार 835
(बारणे आघाडी – 4935)
चिंचवड विधानसभा
श्रीरंग बारणे – 1 लाख 86 हजार 235
संजोग वाघेरे – 1 लाख 11 हजार 470
(बारणे आघाडी – 74 हजार 765)
पिंपरी विधानसभा
श्रीरंग बारणे – 93 हजार 323
संजोग वाघेरे – 76 हजार 592
(बारणे आघाडी – 16 हजार 731)
Comments
Post a Comment