"एक झाड माझ्या सत्यवानासाठी", शेतकरी कामगार पक्षाचा स्तुत्य उपक्रम"

 



"एक झाड माझ्या सत्यवानासाठी", शेतकरी कामगार पक्षाचा स्तुत्य उपक्रम"

 पनवेल / प्रतिनिधी 

जून रोजी वटपौर्णिमा सण सगळीकडे उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्त गृहिणी वडाच्या झाडाजवळ जाऊन त्याची मनोभावे पूजा करतात आणि आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य मिळावे ही प्रार्थना करतात. घरामध्ये पूजन करते वेळी सदर वृक्षाची तोड करून वृक्षहानी ही मोठ्या प्रमाणात होते या गोष्टी लक्षात घेऊन पनवेल महानगरपालिकेचे मा.विरोधी पक्षनेते श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या संकल्पनेतून उलवे मधील भगिनींसाठी शेतकरी कामगार पक्ष आणि जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने वडाचे छोटे रोपटे पूजनासाठी सोसायटी आणि सोसायटीच्या परिसरांमध्ये भेट म्हणून देण्याचा उपक्रम वटपौर्णिमेनिमित्त राबवण्यात आला .     

        भगिनींना आपल्या इमारतीच्या आवारातच सोसायट्यांमध्ये सदर रोपे देऊन पूजन करण्यासाठी आमच्याकडून एक पाऊल उचलण्यात आले आहे असे विरोधी पक्षनेते श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्याकडून सांगण्यात आले. या उपक्रमात आम्ही उलवेकर महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन सदर रोपटे विविध ठिकाणी महिलांना भेट दिले.




Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर